मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात शेकडो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ

CD

समाधान शिबिरात नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ

विक्रमगड, ता. १८ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील चिंचघर मंडळ येथे महसूल प्रशासन व विविध शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना, प्रमाणपत्रे व दाखले एकाच ठिकाणी थेट वितरित करण्यात आले.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, तसेच विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, या उद्देशाने या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात महसूल, आरोग्य, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, भूमी अभिलेख आदी विभागांनी सहभाग नोंदवून नागरिकांना सेवा उपलब्ध करून दिल्या.
या शिबिराला प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार विक्रमगड मयूर चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, भूमी अभिलेख उपअधीक्षक तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरामध्ये ७४ शालेय विद्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्रे व जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
तसेच आरोग्य विभागामार्फत ६२ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. महसूल व जमीन अभिलेख सेवामार्फत १६७ लाभार्थ्यांना डिजिटल सातबारा उतारे, ४३ नागरिकांना डिजिटल ८-अ उतारे, १४ अर्ज सातबारा दुरुस्तीसाठी स्वीकारण्यात आले. या वेळी प्रलंबित ७३ फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली.
३२ लाभार्थ्यांना वारस नोंदीचा लाभ देण्यात आला. अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत ५३ नागरिकांना नवीन शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. सामाजिक न्याय विभागातर्फे १८ लाभार्थ्यांना सामाजिक विशेष अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्यात आला. कृषी विभागामार्फत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत १८ शेतकऱ्यांनी लाभ घेतला. एकाच ठिकाणी विविध शासकीय विभागांच्या सेवा उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अनेकांनी प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशी शिबिरे आयोजित करण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात एन्ट्री; उप कर्णधाराची जबाबदारी, वैभव सूर्यवंशीही संघात...

CNG Shortage: पालघरमध्ये सीएनजीचा तीव्र तुटवडा! ३ किमी लांब वाहनांच्या रांगा, इंधनासाठी ५ तास चालक प्रतिक्षेत

Repo Rate News: होम लोन आणि FD गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! RBI व्याजदर बदलणार का? मोठा निर्णय लवकरच

"कास्टिंग काऊचमुळे लेकीने इंडस्ट्री सोडली" अभिनेत्रीने व्यक्त केली खंत "आता जगावंसं वाटत नाही"

Maharashtra Weather: अल निनोमुळे मान्सूनचा प्रवास थांबला, आगमन लांबणीवर? शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

SCROLL FOR NEXT