मुंबई

थकीत कर न भरल्याने पेट्रोल पंप सील

CD

उरण, ता. १७ (बातमीदार) : थकीत मालमत्ता कर वारंवार नोटीस देऊनही न भरल्याने धुतुम ग्रामपंचायतीने जप्तीची कारवाई करत राधा ऑटो केअर हा पेट्रोल पंप सील केला आहे.

धुतुममधील या पेट्रोल पंपाकडे एकूण २१ लाख १५ हजार ७७७ रुपये करापोटी थकीत होते. कराची वसुली न झाल्याने पंपावरील कार्यालय, सेल्स रूम आणि सीएनजी युनिटला सील ठोकण्यात आले आहे. गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विस्तार अधिकारी विनोद मिंडे यांच्या उपस्थितीत पंचनामा करून ही कारवाई पूर्ण करण्यात आली. धुतुम सरपंच सुचिता ठाकूर आणि ग्रामविकास अधिकारी नागनाथ भाडगे यांनी ही जप्तीची प्रक्रिया राबवली. या वेळी ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित होते.

संबंधित मालमत्ताधारकाला गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर आणि १ डिसेंबरला मागणी देयक व रिट नोटीस देण्यात आली होती, तरीही कराचा भरणा न केल्याने टोकाची भूमिका घ्यावी लागली. जप्तीनंतरही १५ दिवसांत रक्कम न भरल्यास जप्त मालमत्ता विकून वसुली करण्याची तरतूद कायद्यात असल्याचेही ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी ६० टक्के भूसंपादन; संमतिपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत, आतापर्यंत ९०० कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटप

अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना निवडता येतील 300 महाविद्यालये! प्रवेशासाठी लागणार ‘ही’ कागदपत्रे, जूनमध्येच प्रवेश नोंदणी, 4 प्रवेश फेऱ्या

Panchang 8 June 2026 : आजचे पंचांग! कालाष्टमी, मृग नक्षत्र प्रवेश आणि शुभ योग

साधे पोहे विसरा! वजन कमी करणाऱ्यांचा नवा फेव्हरेट ठरतोय हा 'फायबरयुक्त चिला'; जाणून घ्या सोपी रेसिपी

शेतकऱ्यांना आता ऑनलाईन बुकिंगशिवाय खते नाहीतच! आधार क्रमांक, जमीन, पिकाची माहिती, खतांची पोती, दुकानदार निवडावा लागणार; टोकनद्वारे 3 दिवसांत मिळेल खत

SCROLL FOR NEXT