मुंबई

नवी मुंबई पोलिसांचे कोपरखैरणेत कोम्बिंग ऑपरेशन

CD

नवी मुंबई पोलिसांचे कोपरखैरणेत कोम्बिंग ऑपरेशन
गावठी कट्टा आणि हायड्रो गांजा जप्त, १४ गुन्हे दाखल
नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने अवैध धंद्याविरुद्ध पुकारलेल्या झीरो टॉलरन्स मोहिमेअंतर्गत कोपरखैरणे परिसरात रविवारी (ता. १५) मध्यरात्री जोरदार कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस हस्तगत केले असून, महागडा हायड्रो गांजासह अवैध दारू आणि गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या मोहिमेत एकूण १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे आणि पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोनकोडे गाव आणि सावली गाव या संवेदनशील भागात हे ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेत परिमंडळ-१ मधील ५ पोलिस ठाण्यांचे पाच पोलिस निरीक्षक, १५ सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक आणि १३५ पोलिस अंमलदार यांच्या पथकाने एकाच वेळी झडती सत्र सुरू केले. या कारवाईत एका व्यक्तीकडून एक देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. २५.५ ग्रॅम वजनाचा उच्च प्रतीचा हायड्रो गांजा बाळगणाऱ्या आरोपीवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. या वेळी अभिलेखावरील २२ गुन्हेगारांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. तसेच सात पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यात आला. त्याचप्रमाणे दारूबंदी कायद्यान्वये एक केस, गुटखा पीची एक केस आणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर चार केसेस दाखल करण्यात आल्या. या मोहिमेदरम्यान नाकाबंदी करून २६० वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२२ जणांवर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान केवळ स्थानिक गुन्हेगारच नव्हे, तर परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि नायजेरियन नागरिकांचीही कसून तपासणी करण्यात आली. शहरातील लॉजेस आणि हॉटेल्समधील संशयास्पद हालचालींवर पोलिसांनी करडी नजर ठेवत आठ ठिकाणांची तपासणी केली. तसेच पाच वॉरंटची बजावणीदेखील करण्यात आली. अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींविरुद्ध नवी मुंबई पोलिसांचे धोरण कडक पावले उचलली आहेत. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारचे कोम्बिंग ऑपरेशन यापुढेही सातत्याने राबविले जातील, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गवळी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT