मुंबई

त्रिकर्म उत्सवाचे आयोजन

CD

त्रिकर्म उत्सवाचे आयोजन
वाडा (बातमीदार) : आधुनिक जीवनशैलीमुळे कुटुंबव्यवस्था, कुलपरंपरा आणि संस्कार यांच्याशी नव्या पिढीचे नाते कमी होत चालल्याची चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर एकतारा गुरुकुल तर्फे वाडा तालुक्यात ‘त्रिकर्म उत्सव’ व गृह गुरुकुल अभियान सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये माता-पिता हेच मुलांचे पहिले गुरू असल्याची भावना समाजात दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कुटुंबातूनच संस्कार, परंपरा आणि मूल्यांचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम पी. जे. महाविद्यालय वाडा येथे गुरुवारी (ता. १९) संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. या कार्यक्रमामध्ये कुलवृक्ष (वंशावळ) तयार करण्याचे विशेष अभियान, कुटुंब परंपरेची माहिती संकलन, तसेच समाजामध्ये संस्कार आधारित जीवनपद्धती रुजविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या पूर्वजांशी, कुलपरंपरेशी आणि सांस्कृतिक मुळांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वाडा तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिक, पालक व विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी होणार असून, समाजातील कुटुंबव्यवस्था मजबूत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. यानिमित्त परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Girl Acid Attack: शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं, नराधम फरार

Laxman Hake : सुनेत्रावहिनींना विधानपरिषदेवर बिनविरोध पाठवा; बारामतीची निवडणूक आम्ही ठामपणे लढविणार...

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

हा राया नाहीतर भलताच ! मालिकेतून 4 कलाकार बाहेर पडल्यानंतर आलेल्या नव्या ट्विस्टने प्रेक्षक चक्रावले

दोन बहिणी, दोन मालिका, झी मराठीच्या 'या' नायिका आहेत सख्ख्या बहिणी; गाजवतायत टीव्ही इंडस्ट्री, तुम्ही ओळखल्या का?

SCROLL FOR NEXT