मुंबई

सापडलेले २८ हजार रुपये प्रशासनाकडे सुपूर्द

CD

अंबरनाथ, ता. १८ (वार्ताहर) : अंबरनाथ नगर परिषदेत प्रामाणिकपणाचा आदर्श ठरेल, अशी घटना घडली आहे. कर भरण्यासाठी आलेल्या दामिनी चंद्रकांत पेडणेकर या युवतीला कर विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ २८ हजार रुपयांची रक्कम सापडली. मात्र, रकमेचा मोह न बाळगता तिने प्रामाणिकपणाची कास धरत ती तत्काळ प्रशासनाकडे सुपूर्द केली.
दामिनीने सापडलेली रक्कम तेथे उपस्थित असलेल्या एमएसएफ महिला सुरक्षा रक्षक शामल ताडगे यांच्याकडे दिली. तिच्या या प्रामाणिक कृतीमुळे तिचे कौतुक होत आहे. घटनेची माहिती मिळताच कर अधीक्षक नरेंद्र संख्ये तसेच मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दामिनी पेडणेकर हिचा सत्कार करून तिच्या प्रामाणिकपणाचे विशेष कौतुक केले. समाजात अशा जबाबदार वर्तनाची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. दरम्यान, सापडलेली रक्कम कोणाची असल्यास संबंधित नागरिकांनी आवश्यक पुराव्यांसह अंबरनाथ नगर परिषद कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT