मुंबई

गुढीपाडव्याला नऊवारीची शान काही औरच!

CD

गुढीपाडव्याला नऊवारीची शान काही औरच!
बाजारपेठेत महिला मंडळीची गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लगबग
बेलापूर, ता. १८ (बातमीदार) : गुढीपाडव्याचा दिवशी घरोघरी विजयाची गुढी उभारून हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा गुरुवार, १९ मार्चला सर्वत्र गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. ढोल-ताशांच्या मिरवणुका, मराठमोळा थाट, रांगोळी, गोडधोड आणि पारंपरिक वस्त्रे परिधान करून घरोघरी हा गुढीपाडवा चैतन्यमय वातावरणात साजरा होतो. या दिवशीचे खास आकर्षण असते ती म्हणजे शोभायात्रा. यामध्ये महिला, तरुणी पारंपरिक साडी परिधान करतात. मराठमोळी साडी, नथ, फेटा तसेच आभूषणे घालून मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते. लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलादेखील शोभायात्रेत सहभागी होत असतात. काही ठिकाणी महिला लेझीम, समूह नृत्य, ढोल-ताशा पथक, विविध कसरतीचे खेळ दाखवतात. पारंपरिक वेशात नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, फेटा, नऊवारी साडी असा वेश परिधान करून गुढीपाडवा शोभायात्रेची रंगत वाढवली जाते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महिलांची नऊवारी साडीला मागणी कायम आहे. सौंदर्यात भर टाकणाऱ्या या नऊवारीची शान काही औरच असते. इतर सणांपेक्षा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नऊवारीला अधिक प्राधान्य दिले जाते. बाजारात १,५०० रुपयांपासून ते ६,००० रुपयांपर्यंत नऊवारीचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. काही नऊवारी साड्या या रेडी टू व्हेअर अशा स्वरूपातदेखील उपलब्ध आहेत.
सध्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यामध्ये ब्राह्मणी, डिझायनर, सिल्क नऊवारी साड्यांची मागणी वाढली असल्याचे दादर येथील विक्रेते देशपांडे यांनी सांगितले. पूर्वीच्या काळात ब्राह्मणी नऊवारी साड्या मुख्य प्रसंगी नेसल्या जायच्या. ही नऊवारी साडी नेसायची एक विशिष्ट पद्धत आहे. मात्र दिवसागणिक ब्राह्मणी साडी तरुणींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांच्या आवडीची ठरत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. तर सिल्कच्या नऊवारी साड्यांना खूप मागणी आहे. या सिल्क साड्यांमध्ये पैठणी सिल्क नऊवारी साडी जास्त प्रमाणात वापरली जाते. त्यासोबत तरुणींमध्ये डिझायनर नऊवारी साड्यांची क्रेझ असून, डिझायनर साड्यांसाठी महाविद्यालयीन मुलींची मागणी वाढली आहे.

फेटा, पुणेरी पगडी हवीच!

शोभायात्रेवेळी बाइक रॅलीत सहभागी अनेक तरुणी आणि महिलांनी छाप पाडण्यासाठी वेगवेगळे पारंपरिक वेश परिधान केले जातात. वेगवेगळ्या रंगांचे, प्रकारचे फेटे, पुणेरी पगडी यांची मागणी केली जात असून, हटके लूकसाठी महिलांची लगबग सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT