अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी दोघांना अटक
चेंबूर, ता. १८ (बातमीदार) : शिधा कार्यालयातून रेशन कार्ड तयार करून देण्याचे प्रलोभन देऊन दोघांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी (ता. १५) चेंबूर परिसरात घडली. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे.
अफताफ आझमी व अनिश चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. उपनगर परिसरात पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह राहत आहे. पीडितेला रेशन कार्ड हवे असल्याने ती कित्येक महिने शिधापत्रिका कार्यालयाचे उंबरठे झिजवत होती; मात्र तिला रेशन कार्ड मिळत नव्हते. याचदरम्यान एक जण रेशन कार्ड तयार करून देतो, अशी तिला माहिती मिळाली होती. त्यानुसार तिने आरोपीला संपर्क केला. आरोपीने मुलीला मदत करण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी बोलावले. त्यानंतर या आरोपी आणि त्याच्या साथीदाराने या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर घाबरलेल्या पीडिताने ही बाब तत्काळ घरी सांगितली. त्यानुसार कुटुंबीयांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.