मुंबई

धान्य खरेदीचे चुकारे रखडले

CD

धान्य खरेदीचे चुकारे रखडले
शेतकरी आर्थिक अडचणीत

वाडा, ता. १९ (बातमीदार) : शासनाने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांनी निश्चित तारखांना आपले धान्य खरेदी केंद्रावर जमा केले आहे. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आपला भात हा खरेदी केंद्रावर पोहोचवला आहे. दरम्यान, या सर्व प्रक्रियेस एक ते दीड महिना उलटून गेला असला तरी अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चुकारे (विक्रीचे पैसे) जमा केलेले नाहीत. त्यामुळे शेतकरीवर्गात नाराजी पसरली आहे.
तसं पाहता, महाराष्ट्र राज्य सहकारी धान्य खरेदी महामंडळअंतर्गत जव्हार प्रादेशिक कार्यालयामार्फत यावर्षी जानेवारीपासून शेतकऱ्यांकडून उत्पादित धान्य (भात) खरेदीस सुरुवात करण्यात आली आहे. या धान्य खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना केंद्रावरच अधिकृत पावत्या देण्यात आल्या असून, त्यामध्ये धान्याचे वजन, प्रतिक्विंटल दर व देय असलेली एकूण रक्कम नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या विक्रीची अधिकृत नोंद उपलब्ध झाली आहे. मात्र, धान्यविक्रीनंतर तब्बल एक ते दीड महिना उलटूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चुकारे (पेमेंट) जमा झाले नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, यंदाही शेतकऱ्यांनी पीककर्ज, पेरणी खर्च व इतर शेतीविषयक गरजांसाठी बँका व पतसंस्थांकडून कर्ज घेतले आहे. शासनाच्या नियमानुसार मार्च अखेरपर्यंत कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांना व्याज सवलत तसेच सुमारे ५० हजार रुपयांपर्यंत शासन अनुदानाचा लाभ मिळतो, परंतु धान्यविक्रीचे पैसे वेळेत न मिळाल्यास शेतकऱ्यांना कर्जफेड करणे कठीण जाणार आहे. परिणामी, अनेक शेतकरी शासनाच्या सवलतींपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
सद्यःस्थितीत पालघर जिल्ह्यात एकूण एक लाख १० क्विंटल धान्य खरेदी करण्यात आली असून, १३ हजार शेतकरी या प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त केली. जव्हार प्रादेशिक कार्यालयाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रलंबित देयके शुक्रवार (ता. २०) पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावीत, अशी ठाम मागणी केली आहे. धान्यविक्री करूनही पैसे मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. एका बाजूला शेतखर्च वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला हक्काचे पैसे रखडले आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, असे मत शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.
---------------------------
ज्या शेतकऱ्यांनी २१ फेब्रुवारीपर्यंत भातविक्री केंद्रावर भात जमा केले होते. अशा २ हजार २०० शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, उर्वरित शेतकऱ्यांचे पैसेही लवकरात लवकर जमा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केंद्रावर भात जमा केला नाही. अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर भात जामा करावे, कारण ३१ मार्च शेवटची तारीख आहे.

- योगेश पाटील, प्रादेशिक अधिकारी
आदिवासी विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय, जव्हार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : PNG कनेक्शन लगेच मिळणार, केंद्र सरकारचे राज्यांच्या यंत्रणांना आदेश

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

SCROLL FOR NEXT