मुंबई

थॅलेसेमिया तपासणी शिबिराला प्रतिसाद

CD

थॅलेसेमिया तपासणी शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद

विक्रमगड, ता. १९ (बातमीदार) : विक्रमगड शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन नवरंग मित्र मंडळ विक्रमगड आणि अर्पण थॅलेसेमिया अँड सिकलसेल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थी, पालक व नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे आयोजन बुधवारी (ता. १८) तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये करण्यात आले होते. यात लिटील एंजल्स इंग्रजी माध्यम शाळा, कै. उल्हासराव भोईर आश्रमशाळा, विद्यादान विद्यामंदिर, सावरखिंड या संस्थांचा समावेश होता. थॅलेसेमिया हा आनुवंशिक रक्तविकार असून, वेळेवर निदान झाल्यास भविष्यातील गंभीर आरोग्य समस्या टाळता येऊ शकते. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये या आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासह तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे शिबिर राबविण्यात आले.
शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अर्पण थॅलेसेमिया अँड सिकल सेल सोसायटीच्या सर्व सभासदांनी तसेच परिचारिका यांनी मोलाचे सहकार्य केले. नवरंग मित्र मंडळाचे संस्थापक महेश आळशी व मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्थानिक स्वयंसेवकांनीही शिबिराच्या नियोजनात व अंमलबजावणीत सक्रिय सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे विक्रमगड तालुक्यात आरोग्य जनजागृतीस चालना मिळाली असून, भविष्यातही अशा आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस आयोजक संस्थांनी व्यक्त केला.

फोटो ओळ - विक्रमगड : थॅलेसेमिया तपासणीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: बंगाल ते आसाम... ५ राज्यांचा निकाल आज! कोण जिंकणार सत्ता? निकाल कुठे आणि किती वाजता पाहणार?

Spider Species Discovery: ‘मोग्रस पुणे’सह कोळ्यांच्या चार नव्या प्रजातींचा शोध, पिंपरी चिंचवडमधील उद्यानात जैवविविधता सर्वेक्षणावेळी संशोधन!

Breakfast Special Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा आंबट-गोड कैरी स्प्रेड; चपाती किंवा ब्रेडसोबत लागेल भन्नाट चव

Highway Traffic jam: महामार्गावर वाहतूक कोंडीचा पुन्हा ‘शो’; आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा, अन्यही मार्गावर संथ गती!

स्मार्ट गुंतवणूक : लिक्विड म्युच्युअल फंड

SCROLL FOR NEXT