गॅसटंचाईवर संताप
मुंबई, ता. १९ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांचा जयघोष करत वाजत-गाजत, गुलाल उधळत नववर्षाचे मनसैनिकांनी आज शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात जल्लोषात स्वागत केले. मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या मनसैनिकांनी अवकाळी पाऊस आणि गॅसटंचाईविषयी संताप व्यक्त केला. राज ठाकरे यांच्या आदेशाची आम्ही वाट पाहत असून, या कठीण काळात तेच दिशा दाखवतील, असा विश्वास मनसैनिकांनी व्यक्त केला. शिवाजी पार्कसह दादरच्या पश्चिमेचा भाग मनसेचे झेंडे, बॅनर आणि होर्डिंगने भगवामय झाला हाेता. सायंकाळी ४.३०नंतर कार्यकर्ते सभास्थळी जमा होऊ लागले. महिला आणि तरुणांची संख्या लक्षणीय होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.