मुंबई

नव्या प्रभाग रचनेवरून वाद

CD

नव्या प्रभागरचनेवरून वाद
प्रस्तावाला महासभेत मंजुरी, भाजपचा विरोध
विरार, ता. २१ (बातमीदार)ः वसई़-विरार पालिकेतील प्रभाग समिती सभापती बविआचे असावा, यासाठी नवीन रचनेचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला होता. बहुमताच्या जोरावर बविआने प्रस्ताव मंजूर केला असला तरी राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे.
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीने सत्ता प्रस्थापित केली. महापौरांसह सर्व महत्त्वाची पदे बविआकडे आहेत. महिला व बालकल्याण, आरोग्य, परिवहन समितीच्या सभापती पदावर संख्याबळानुसार बविआचे पदाधिकारी होते. मात्र, प्रभाग समित्यांमध्ये बविआचे वर्चस्वासाठी जुन्या प्रभागरचनेत फेरबदल करण्याचा विषय शुक्रवारच्या सभेत मांडण्यात आला. सभागृह नेते प्रफुल्ल साने यांनी कायदेतज्ञांचे मार्गदर्शन घेत नव्या प्रभागरचनेचा प्रस्ताव सभेत मांडला. मात्र, विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी प्रस्तावाला स्थगितीची मागणी केली. त्यामुळे महापौरांनी मतदान घेण्याचे निर्देश दिले. या वेळी बविआच्या ६९ सदस्यांनी प्रस्तावाला समर्थन दिले जर भाजपच्या ४३ सदस्यांनी विरोध दर्शविला. बविआकडे स्पष्ट बहुमत असल्याने प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे नऊ पैकी आठ प्रभाग समित्यांवर बहुजनचे वर्चस्व राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
-----------------------------
षडयंत्राचा आरोप
भाजपला तीन ठिकाणी प्रभाग समितीचे सभापतिपद मिळणार आहे, परंतु बहुजन विकास आघाडीने प्रशासनाला हाताशी धरून हा जाणीवपूर्वक रचलेला कट रचल्याचा आरोप आरोप विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी सभागृहात केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Baby Girl Born : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कन्यारत्नाचे आगमन... आणि तेही रुग्णवाहिकेत! ; ‘१०८’ टीम ठरली देवदूत

Latest Marathi News Live Update : जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन व इलेक्ट्रिक शेगड्यांचा तुटवडा

SCROLL FOR NEXT