'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Cheteshwar Pujara Predicts Explosive IPL 2026 Season for Shubman Gill: गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलसाठी आयपीएल २०२६ पुन्हा भारतीय टी२० संघात स्थान मिळवण्यासाठी महत्त्वाचे असेल, असं पुजाराने म्हटलं आहे. त्याने गुजरात टायटन्सच्या संघाबाबतही मोठं भाष्य केलं.
Cheteshwar Puajara on Shubman Gill | IPL 2026

Cheteshwar Puajara on Shubman Gill | IPL 2026

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेत गुजरात टायटन्सचा संघ पुन्हा शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळण्यास सज्ज आहे. यंदा दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) प्रयत्न असणार आहे. गेल्या वर्षी त्यांनी प्लेऑफपर्यंत धडक मारली होती. मात्र त्यांना एलिमिनेटरमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं.

आता यावेळी ट्रॉफीपर्यंत पोहचण्याचा त्यांचा हेतू असेल. त्यांचा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदाव असल्याचे चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) म्हटले आहे. याशिवाय शुभमन गिलला (Shubman Gill) टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतीय संघात संधी न मिळाल्याने त्याला आता आणखी चांगलं खेळण्याची प्रेरणा मिळाली असेल, असंही पुजाराने म्हटले आहे.

<div class="paragraphs"><p>Cheteshwar Puajara on Shubman Gill | IPL 2026</p></div>
IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com