मुंबई

निळज येथे श्री वाकडाई माता मंदिराचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

CD

निळज येथे श्री वाकडाई माता मंदिराचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात
माणगाव, ता. २१ (वार्ताहर) ः माणगाव तालुक्यातील निळज येथे श्री वाकडाई माता मंदिराचा प्रथम वर्धापनदिन सोमवार (ता. १६) उत्साहात पार पडला. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. देवीचा अभिषेक सोहळा आणि श्रीसत्यनारायणाची महापूजा भक्तिमय वातावरणात पार पडली. त्यानंतर महाआरती व तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. यानंतर देवीच्या पालखी सोहळ्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी पालखी नाचवत खालू बाजाच्या तालावर लेझीमचा ठेका धरला. रात्रीच्या भजन कार्यक्रमामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमासाठी निळज, धरणाची वाडी, बौद्धवाडी, आदिवासीवाडी तसेच परिसरातील ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो :
माणगाव ः वाकडाई माता मंदिराचा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

७०व्या वर्षी नेत्याचं २० वर्षीय तरुणीशी चौथं लग्न, दुसऱ्या पत्नीची पोलिसात धाव; ११ अपत्यांचा बाप, मुलं न झाल्यानं तिसरीला घटस्फोट

IND vs PAK Match Ban: मोठी बातमी! पाकिस्तानी खेळाडू भारतात येऊ शकतील, पण...; भारत-पाकिस्तान सामन्यांवर सरकारचा महत्त्वाचा निर्णय

अवघ्या 24 तासांत बदलणार कन्या राशीसकट आणखी दोन राशींचं नशीब ! बुधाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मिळणार पैसाच पैसा

T20 Mumbai League: श्रेयस अय्यर, अंगकृश रघुवंशी एकाच संघात! आकाश पारकर १२ लाख रुपयांच्या सर्वोच्‍च बोलीसह करारबद्ध

Tata Motors टाटा एस गोल्ड+ XL लाँच; अधिक पेलोड, अधिक कमाई, उद्योजकांसाठी नवे संधीचक्र

SCROLL FOR NEXT