

Tata Ace Gold+ XL launch price features details
esakal
प्रतिष्ठित टाटा एसच्या २१ वर्षपूर्तीचे औचित्य साधत टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज ऑल-न्यू टाटा एस गोल्ड+ एक्सएल लाँच केली. या लाँचमुळे लास्ट-माईल मोबिलिटी क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. अधिक वजन क्षमता (पेलोड) आणि लांब बॉडी लक्षात घेऊन डिझाइन केलेला हा नवीन व्हेरिएंट लास्ट-माईल लॉजिस्टिक्सच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी एस पोर्टफोलिओचा विस्तार करतो.