मुंबई

भिवंडी सब जेलमधून फरार आरोपीला अटक

CD

भिवंडी सब-जेलमधील फरार आरोपीला अटक
शांतीनगर पोलिसांची कारवाई

भिवंडी, ता. २१ (वार्ताहर) : भिवंडीतील सब-जेलमधून महिनाभरापूर्वी खिडकीची सळई तोडून फरार झालेल्या कुख्यात घरफोडी आणि सोनसाखळी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश आले आहे. रवींद्र धनाजी भोसले असे आरोपीचे नाव असून, त्याला कोल्हापूरच्या रंकाळा परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

रवींद्र भोसले याच्यावर भिवंडी, कल्याण आणि पुणे येथे घरफोडी, मोबाईल चोरी आणि चेन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत. भिवंडी गुन्हे शाखेने त्याला ८ फेब्रुवारीला अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी भिवंडीतील सब-जेलमध्ये करण्यात आली होती. १६ फेब्रुवारीला औषध आणि जेवण देण्यासाठी त्याला पॅसेजमध्ये आणले असता, त्याने संधी साधून लोखंडी खिडकीची सळई तोडली आणि तेथून पलायन केले. या घटनेमुळे पोलिसदलात मोठी खळबळ उडाली होती.

फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली होती. तांत्रिक तपासाद्वारे आरोपी कोल्हापूरमधील रंकाळा परिसरात असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. शांतीनगर पोलिसांनी आरोपीला भिवंडी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : मुळशीत आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलीसोबत विक्रेत्याचं धक्कादायक कृत्य; गावकऱ्यांचा संताप!

MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनी १८ मे रोजी निवृत्त होतोय? पाच वर्षांपूर्वी त्याने तसं म्हटलं होतं अन्...

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची मोठी अपडेट; जाणून घ्या २,००० रुपये कधी मिळणार?

Manoj Jarange Patil: राज्यातील भाजप सरकार उलथवून लावण्याची गरज: मनाेज जरांगे-पाटील, बंगालमध्ये गडबड केल्याचा संशय!

Latest Marathi News Live Update : नसरापूर अत्याचारप्रकरणी येत्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

SCROLL FOR NEXT