

MS Dhoni Retirement
esakal
Dhoni Retirement: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ चा हंगाम सुरू आहे. आयपीएल इतिहासात सर्वात यशस्वी संघांमध्ये जर नाव घ्यायचं झालं तर चेन्नई सुपर किंग्सचं(Chennai Super Kings) नाव नक्कीच येतं. आयपीएल सुरू झाल्यापासून चेन्नई संघाचा मुख्य चेहरा म्हणजे महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni)आहे. या हंगामात तो त्याच्या दुखापतीमुळे गेल्या सगळ्या सामन्यांना मुकला आहे. अशातच २०२१ ची एक जुनी पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनी १८ मे रोजी निवृत्ती जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे.