आईबाबा फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्रात सामुदायिक अग्निहोत्र कार्यक्रम
खालापूर, ता. २१ (बातमीदार) : आईबाबा फाउंडेशन, चौक येथे सामुदायिक अग्निहोत्र कार्यक्रम उत्साह आणि आध्यात्मिक वातावरणात झाला.
आईबाबा फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्रात नुकतेच गुरुमंदीर श्री स्वामी समर्थ संस्थापित बाळाप्पा महाराजांचा मठ, अक्कलकोट, विश्व फाउंडेशन शिवपुरी अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली १०८ सामुदायिक अग्निहोत्र कार्यक्रम करण्यात आला. श्री स्वामी समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक उपक्रमात सहभागी झाले. याप्रसंगी उपस्थितांनी अग्निहोत्राच्या माध्यमातून पर्यावरण शुद्धीकरण, मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा संदेश समाजाला दिला.
अग्निहोत्र ही भारतीय वैदिक परंपरेतील अत्यंत प्रभावी साधना मानली जाते. यामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास, आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास आणि मन:शांती मिळण्यास मदत होते. अशा सामुदायिक उपक्रमांमुळे समाजात आध्यात्मिक जागृती, एकात्मता आणि संस्कृतीची जपणूक अधिक बळकट होत असल्याचे मत आईबाबा फाऊंडेशनचे संचालक प्रविण नवरे यांनी सांगितले.
**फोटो-अग्निहोत्र कार्यक्रमात व्यसनमुक्ती केंद्रात दाखल रुग्ण सहभागी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.