दुर्लक्षित गार्डनला नागरिकांनी दिले नवे रूप
गाडगेबाबांच्या प्रेरणेने स्वच्छता मोहीम
उलवे, ता. २१ (बातमीदार) : उलवे नोड सेक्टर २० मधील गार्डन गेल्या दोन ते चार वर्षांपासून धूळ व कचऱ्यामुळे दुर्लक्षित अवस्थेत होते. स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत स्वच्छता मोहीम राबवून गार्डनला नवे रूप दिले.
या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष व युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. सर्वांनी मिळून कचरा साफ करत गार्डन पुन्हा स्वच्छ व वापरयोग्य बनवले. या मोहिमेसाठी अखिलेश यादव यांचे विशेष सहकार्य लाभले. नागरिकांच्या या प्रयत्नामुळे परिसरात स्वच्छतेचा सकारात्मक संदेश पसरला असून, प्रशासनानेही अशा उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोट
अलीकडेच संत गाडगेबाबांची जयंती झाली. त्यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशातून प्रेरणा घेत आम्ही ही मोहीम हाती घेतली. पुढेही हे गार्डन स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्याचा आमचा मानस आहे.”
- नंदकुमार आवळे, स्थानिक नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.