नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : तुर्भे एमआयडीसीतून सायकलवरून जाणाऱ्या एका व्यक्तीला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २०) तुर्भे येथील सिझेरा कंपनीसमोर, एस. सेंट्रल रोडवर घडली. तुर्भे पोलिसांनी याप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातातील मृत व्यक्तीचे नाव रामाशंकर फुलेना प्रसाद (वय ५५) असे असून ते नेरूळ सेक्टर एकमध्ये राहत होते. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास प्रसाद हे त्यांच्या सायकलवरून तुर्भे एमआयडीसीत जात होते. या वेळी ते सिझेरा कंपनीजवळ आले असताना, पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने (क्र. एमएच ४३ यू ०१८८) त्यांना जोरात धडक दिली. या धडकेमुळे प्रसाद यांच्या कमरेखाली गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर तुर्भे पोलिसांनी ट्रकचालक नगीनाप्रसाद राजभर (४८) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.