मुंबई

गॅसटंचाईप्रकरणी नगरसेवक शेवाळे यांची पाहणी

CD

पनवेल, ता. २१ (बातमीदार) : कळंबोली परिसरात सध्या एलपीजी गॅससंदर्भात निर्माण झालेल्या अडचणी, वाढती गर्दी आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती लक्षात घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक रामदास शेवाळे यांनी संबंधित गॅस एजन्सींना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. या वेळी त्यांनी गॅस एजन्सीतील अधिकाऱ्यांशी चर्चा करून गॅस पुरवठ्याबाबत माहिती घेत नागरिकांना दिलासा दिला.

पूर्वी दररोज साधारण दोन ट्रक गॅसचा पुरवठा होत होता. मात्र, सध्या नागरिकांची वाढती गरज लक्षात घेऊन दररोज तीन ट्रक गॅस उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे गॅसची कोणतीही कमतरता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काही तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे वितरणात थोडा उशीर होत असला तरी प्रत्येक नागरिकापर्यंत गॅस पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एजन्सी प्रशासनाने दिली. सध्या केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर तात्पुरती मर्यादा घालण्यात आली असून, घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. सरकारच्या नियमांनुसार आणि उपलब्धतेनुसार सर्व नागरिकांना गॅस मिळणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कळंबोली परिसरातील गॅसटंचाईबाबत पसरत असलेल्या अफवांमध्ये तथ्य नसून नागरिकांनी घाबरून न जाता संयम राखावा, असे आवाहन शेवाळी यांनी केले. या वेळी रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके, संजय शेडगे, रणजीत फडतरे, प्रेम डांगे, नीलेश दिसले, महेश गोडसे आदी उपस्थित होते.

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Baby Girl Born : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कन्यारत्नाचे आगमन... आणि तेही रुग्णवाहिकेत! ; ‘१०८’ टीम ठरली देवदूत

Latest Marathi News Live Update : जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन व इलेक्ट्रिक शेगड्यांचा तुटवडा

SCROLL FOR NEXT