पडघ्यात रात्रभर सोंगांचा नाच
शेकडो वर्षांची ‘बोहाडा’ परंपरा उत्साहात; भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद
पडघा, ता. २१ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पडघा येथील प्रसिद्ध ‘बोहाडा’ यात्रेला यंदाही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामदैवत गावदेवीचा उत्सव म्हणून गुढीपाडव्यानिमित्त आयोजित या यात्रेत शेकडो वर्षांची परंपरा मोठ्या उत्साहात जपण्यात आली.
ग्रामस्थ जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे नियोजन करण्यात आले होते. बोहाड्याच्या रात्री वाद्यवृंदाच्या तालावर विविध देवी-देवतांचे पौराणिक मुखवटे परिधान करून सोंगे नाचवण्यात आली. रितेश मेस्त्री, जयेश चवरे, राकेश बिडवी, सुनील पाटील, संतोष जोशी, वैभव नागावेकर, चिराग गायकवाड, पंकज कोचीरकर आणि पियुष जरे या तरुणांनी विविध सोंगे साकारून ही कला जिवंत ठेवली.
यात्रेनिमित्त पडघा ग्रामपंचायत ते डॉ. भांगरे दवाखान्यापर्यंतचा मुख्य रस्ता गर्दीने फुलून गेला होता. खाद्यपदार्थ, खेळणी, सौंदर्यप्रसाधने आणि गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलवर महिला व मुलांची मोठी रेलचेल होती. आकाशी पाळणा, होडी आणि लहान मुलांच्या आगगाडीत बसण्यासाठी पर्यटकांनी झुंबड उडवली होती.
धार्मिक विधी आणि सांगता
उत्सवाच्या पूर्वसंध्येला गावदेवी मंदिरात जागर करण्यात आला होता. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि रंगरंगोटी करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पारंपरिक वेशभूषा केलेल्या गावदेवीच्या सोंगाची गावातून मिरवणूक काढून या यात्रेची सांगता झाली. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ मंडळाच्या तरुणांनी विशेष मेहनत घेतली.
फोटो ओळ: पडघा येथील बोहाडा यात्रेत पौराणिक मुखवटे धारण करून वाद्यवृंदाच्या तालावर नाचणारी सोंगे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.