मुंबई

मिरा भाईंदरच्या मेट्रोसाठी पुन्हा नवा मुहूर्त !

CD

दहिसर ते काशीगाव मेट्रोसाठी एप्रिलचा मुहूर्त!
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मार्गाची पाहणी

भाईंदर, ता. २१ (बातमीदार): मिरा-भाईंदरमधील बहुप्रतीक्षित मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा अखेर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. दहिसर ते काशीगाव यादरम्यानची सेवा सुरू करण्यासाठी अंतिम तयारी पूर्ण झाली असून, लवकरच लोकार्पण होणार आहे.

मिरा-भाईंदरमधील मेट्रो प्रकल्पाच्या दहिसर ते काशीगाव या पहिल्या टप्प्यासाठी अखेर एप्रिलचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेले विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या टप्प्याचे उद्‍घाटन होणार असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सरनाईक यांनी शनिवारी (ता. २१) या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.

मिरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पांतर्गत दहिसर ते काशीगाव हा पहिला टप्पा गेल्या वर्षी डिसेंबर अखेर सुरू करण्याचे नियोजन होते, तर काशीगाव ते भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंतचा दुसरा टप्पा यावर्षी डिसेंबरमध्ये पूर्ण करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, डिसेंबरमध्ये पहिला टप्पा सुरू होऊ शकला नाही. त्यानंतर जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उद्‍घाटनाचा विचार करण्यात आला होता. तरीही काही अपूर्ण कामे आणि आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे हा मुहूर्त पुन्हा पुढे ढकलावा लागला. या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी शनिवारी मार्गाची पाहणी करून कामांचा आढावा घेतला.

पहिल्या आठवड्यात लोकार्पण : सरनाईक
पहिल्या टप्प्यातील काही कामे अपूर्ण राहिल्याने प्रकल्पास विलंब झाला, तसेच सुरक्षेसाठी आवश्यक प्रमाणपत्रही अद्याप प्राप्त झाले नव्हते, असे सरनाईक यांनी सांगितले. या मार्गावरून दररोज सुमारे ५० हजार प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा असून, त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. त्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. एमएमआरडीएने सर्व कामे पूर्ण झाल्याचे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सादर केले आहे. २५ मार्च रोजी अधिवेशन संपल्यानंतर लोकार्पणासाठी वेळ निश्चित करण्यात येणार असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मेट्रोचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला केला जाईल, अशी माहिती सरनाईक यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मशीद शेख यांची महाराष्ट्र केसरीत दमदार कामगिरी; सुवर्णपदकासह बुलेट आणि रोख पारितोषिकावर नाव कोरले

LPG Crisis: ऊर्जा संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG पुरवठ्यात 20% वाढ; वाटप 50% पर्यंत वाढवले, राज्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update : सहा आमदारांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले

'स्वामी समर्थ'मध्ये सुरू होणार 'महानिर्वाणाचा अध्याय; हे अभिनेते साकारणार प्रौढ स्वामींची भूमिका

Urali Kanchan News : एमआयटी एडीटी–रायन सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी नवोन्मेष आणि तंत्रज्ञान शिक्षणाची नवी दिशा

SCROLL FOR NEXT