मुंबई

झाडे लावा, झाडे जगवा व वसुंधरा वाचवा या संदेशाच्या माध्यमातून जागतिक वन दिवस साजरा

CD

श्रमिक विद्यालयात जागतिक वनदिन उत्साहात साजरा
वसुंधरा गीताने जिंकली उपस्थितांची मने
रोहा, ता. २२ (बातमीदार) ः रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथे जागतिक वन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. झाडे लावा, झाडे जगवा व वसुंधरा वाचवा अशा पद्धतीने संदेश देणारे वसुंधरा गीत गाऊन विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे मने जिंकली.
राष्ट्रीय हरित सेना व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजनक करण्यात आले होते. याप्रसंगी रोहा परिमंडळ वन अधिकारी व्ही. बी. जाधव, राज्य वन विभागाचे सोमनाथ चव्हाण, वन मजूर सुरेश वाघमारे, गोपीनाथ वाघमारे, मुख्याध्यापक दीपक जगताप, सहाय्यक शिक्षक सुनील थिटे, शशिकांत महाडिक, चंद्रशेखर कांबळे व हरित सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी सर्वप्रथम लागवड केलेल्या वृक्षांच्या रोपांसमोर दीपप्रज्वलन करून पूजन करण्यात आले व रोपांना पुष्पमाला अर्पण केली. झाडे लावा, झाडे जगवा तसेच वसुंधरा वाचवा याबाबत संदेश देणारे वसुंधरा गीत गाऊन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थिनी आस्था थिटे आणि दिशा हळदे यांनी वन दिनाचे महत्त्व व वृक्षारोपण ही काळाची गरज याबाबत आपले मनोगत व्यक्त केले, तर वन विभागाचे अधिकारी सोमनाथ चव्हाण यांनीही पर्यावरण संवर्धन व संरक्षण तसेच जागतिक वन दिवसाबद्दल विद्यार्थीवर्गाला मार्गदर्शन केले.

फोटो कॅप्शन :
रोहा ः जागतिक वनदिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रम उपस्थित वन अधिकारी, शिक्षक विद्यार्थीवर्ग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! नागरिकांना घरबसल्या मिळणार दस्ताची प्रमाणित प्रत; राज्यभर राबवण्यात येणार, नेमकी काय आहे सुविधा?

Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

Shabbir Ahmed Ansari Passes Away: ओबीसी नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे निधन; मंत्री छगन भुजबळांसह ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेकडून शोक व्यक्त!

Solapur Textile Industry: सोलापूरच्या कापड उद्योगास ५०० कोटींचा फटका; कच्चा माल महागला अन् निर्यात विस्कळित; हजार डॉलरचे शिपमेंट ५ हजारांवर!

Latest Marathi News Live Update : भिवंडीतील कोनगाव येथे भंगार गोदामाला भीषण आग; दोन गोदाम जळून खाक

SCROLL FOR NEXT