अंध मुलींच्या हस्तकलेला
भाविकांची पसंती
स्टॉलवरील सर्व वस्तूंची विक्री
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : पुण्यातील ‘दि पुणे स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंड गर्ल्स ट्रेनिंग सेंटर’च्या स्टॉलला भाविकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत स्टॉलवर विक्रीसाठी आणलेल्या जवळपास सर्वच वस्तूंची विक्री झाली होती. या वेळी मुंबई व पुण्यातील तीन भाविकांनी दर्जेदार वस्तू पाहून सेंटरला काही वस्तूंच्या ऑर्डर दिल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. या उपक्रमातून अंध मुली व महिलांना आत्मनिर्भर केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुण्यातील कोथरूड येथे हे सेंटर असून, १८ ते ३५ वयोगटातील अंध मुली व महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा विभाग कार्यरत आहे. चार वर्षांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमात लोकर, मेण, वायर व ज्यूटपासून विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून त्यांना आत्मनिर्भर बनवले जात आहे.
सेंटरमधील प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या ३० ते ४०० रुपयांपर्यंतच्या १८ प्रकारच्या वस्तू ‘सकाळ’तर्फे आयोजित श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. दोन दिवसांच्या या उत्सवात दुसऱ्याच दिवशी सकाळपर्यंत मोठ्या व मध्यम आकाराच्या टोप्या, हेअर बँड, रुमाल, पिशव्या, बास्केट, कँडल्स आदी सर्व वस्तूंची विक्री पूर्ण झाली. यात विशेषतः लोकरीच्या माळांना मोठी मागणी होती.
काही भाविकांनी लोकरीच्या माळा, ज्यूट बॅग आदी वस्तूंची अतिरिक्त मागणी नोंदवली. शिक्षणादरम्यान आत्मनिर्भरतेबरोबरच संगणकाचे मूलभूत शिक्षण व काळानुसार इतर कौशल्यांचे प्रशिक्षणही दिले जात असल्याची माहिती कार्यशाळा अधीक्षक राजू नंदाल व सहाय्यक प्रशासकीय अधिकारी अमित काशीद यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.