Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Harshwardhan Sadgir Becomes Double Maharashtra Kesari: नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पटकावला. त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला किताबाच्या लढतीत पराभूत करत मानाची गटाही जिंकली.
Harshwardhan Sadgir | Maharashtra Kesari 2026 Final

Harshwardhan Sadgir | Maharashtra Kesari 2026 Final

Sakal

Updated on

पुण्यातील वाघोलीमध्ये पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर (Harshwardhan Sadgir) याने पटकावले. मनाच्या चांदीच्या गदेसाठी झालेल्या लढतीत हर्षवर्धनने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला ४-३ अशा गुणांच्या फरकाने पराभूत केले. त्यामुळे हर्षवर्धन सातवा डबल महाराष्ट्र केसरी (Double Maharashtra Kesari) ठरला.

प्रतिष्ठेच्या लढतीसाठी झालेल्या सामन्यात दोन्ही मल्लांनी एकमेकांना अटीतटीची लढत दिली होती. महेंद्र गायकवाडने (Mahendra Gaikwad) सुरुवातीलाच पहिला गुण मिळवला होता. तर नाशिकच्या हर्षवर्धननेही नंतर एक गुण मिळवत बरोबरी केली. दोघेही सुरुवातीपासून आक्रमक खेळत होते.

नंतर महेंद्र गायकवाडला ३० सेंकदाच्या ऍक्टिव्हिटी वेळेत गुण मिळवता न आल्याने हर्षवर्धनला १ गुण मिळाले. पण शेवटच्या क्षणी हर्षवर्धनने दोन गुण मिळवत आघाडी घेतली. शेवटी महेंद्रनेही २ गुण मिळाले. मात्र, वेळ संपल्यानंतर हर्षवर्धनने एका गुणाच्या आघाडीसह महाराष्ट्र केसरी किताब जिंकला.

<div class="paragraphs"><p>Harshwardhan Sadgir | Maharashtra Kesari 2026 Final</p></div>
Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com