मुंबई

विलेपार्ले पूर्वेत गटाराचे झाकण निखळले

CD

विलेपार्ले पूर्वेत गटाराचे झाकण निखळले; नागरिकांच्या जीवितास धोका

मालाड, ता. १ (बातमीदार) : विलेपार्ले पूर्व येथील पार्ले टिळक द्वार क्रमांक दोन परिसरात गटाराचे झाकण निखळल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. झाकण मोडकळीस आल्यामुळे रस्त्यावर मोठी पोकळी तयार झाली असून, येथून जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह वाहनचालकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
हा परिसर अत्यंत वर्दळीचा असून नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. विशेषतः शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात हा धोका अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी तातडीने दखल घेऊन गटाराचे झाकण दुरुस्त करण्याची मागणी मुंबई महापालिकेकडे केली आहे. अपघात होण्यापूर्वीच प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
या खचलेल्या गटाराबाबत पालिकेच्या संबंधित विभागाला माहिती देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. जर झाकण खचून अपघात घडला, तर जबाबदारी कोणाची, असा प्रश्‍न रहिवासी उत्कर्ष बोर्ले यांनी उपस्थित केला आहे.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT