मुंबई

क्षयरोगावर मात करण्याकडे मुंबईची वाटचाल

CD

क्षयरोगावर मात करण्याकडे मुंबईची वाटचाल
तपासणी, जनजागृती आणि उपचारांनी परिस्थिती सुधारली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता. २३ : मुंबईत क्षयरोगाविरुद्ध लढा तीव्र असला तरीही २०२५मध्ये क्षयाचे एकूण ५४ हजार ३९० रुग्ण नोंदले गेले. त्यापैकी ४८ हजार ८३५ रुग्ण हे फक्त मुंबईतील होते. उर्वरित रुग्ण एमएमआर परिसरातील होते. २०२४ मध्ये फक्त ५४,६३८ एवढेच रुग्ण मुंबईतून नोंदवले गेले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ८.९५ टक्के घट झाली आहे.
या रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण फुफ्फुसाबाहेरील प्रकारातील, सहा टक्के लहान मुले आणि आठ टक्के औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या प्रकारातील होते. मात्र चांगल्या तपासणी सुविधा, नवीन उपचार पद्धती आणि सतत रुग्णांचा पाठपुरावा यामुळे अशा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण गेल्या आठ वर्षांत दुप्पट होऊन ८१ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
औषधांना न जुमानणाऱ्या क्षयरोगासाठी ‘बीपाल’ ही प्रगत उपचार पद्धती सुरू करण्यात आली आहे. ३१ केंद्रांमधून रुग्णांना मोफत उपचार दिले जात आहेत. डिसेंबर २०२५पर्यंत १,०९३ रुग्णांवर उपचार सुरू झाले असून, ८९ रुग्णांनी उपचार पूर्ण केले आहेत. तसेच ‘होल जीनोम सिक्वेन्सिंग’ या प्रगत चाचणीद्वारे औषध प्रतिरोधकतेचा अभ्यास करण्यासाठी चाचणी प्रकल्प पूर्ण झाला आहे.
प्रतिबंधासाठी ‘साय-टीबी’ चाचणीद्वारे लक्षणे नसतानाही संसर्ग शोधला जात आहे. २०२५मध्ये १३ हजार ३११ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १,९६१ जण पॉझिटिव्ह आढळले. त्यातील १,६५५ जणांना प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले. तसेच ‘नि:क्षय मित्र’ उपक्रमातून मागील दोन वर्षांत एक लाख ४८ हजार ८६७ अन्नधान्य किट देण्यात आले आहेत.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शहरातील सर्व २६ विभागांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेतले जाणार आहेत. होर्डिंग, बेस्ट बस थांबे, आरोग्य चर्चा आणि रस्त्यावरील नाटके यांद्वारे नागरिकांना माहिती दिली जाणार आहे.

लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, ताप, वजन कमी होणे, रात्री घाम येणे, भूक न लागणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, खोकल्यातून रक्त येणे, थकवा किंवा मानेला सूज ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास जवळच्या महापालिका दवाखान्यात मोफत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तपासणीवर भर
क्षयरोग नियंत्रणासाठी ‘टीबीमुक्त भारत अभियान’अंतर्गत मोठ्या प्रमाणावर लोकांची तपासणी करण्यात आली. अनेक नागरिकांची तपासणी करून संशयित रुग्ण शोधण्यात आले. शहरात ४५ सीबीएनएएटी आणि ३४ ट्रूएनएएटी यंत्रांद्वारे मोफत व अचूक तपासणी केली जाते. तसेच पॅथोडिटेक्ट यंत्रणाही टप्प्याटप्प्याने सुरू केली जात आहे. शिवडी येथील जीटीबी प्रयोगशाळेला अधिक दर्जा देण्यात आला असून, कस्तुरबा रुग्णालयातही टीबी तपासणी सुविधा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT