मुंबई

कुलाबा येथील सांडपाण्यावर प्रक्रिया

CD

कुलाबा येथील सांडपाण्यावर प्रक्रिया
पाणी खरेदीसाठी संस्थांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः कुलाबा येथे सांडपाणी प्रकल्प राबविण्यात आला असून, मलजल प्रक्रिया केंद्रातील ३७ दशलक्ष लिटर क्षमतेच्या प्रकल्पातून १० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री केली जात आहे. हे प्रक्रिया केलेले पाणी प्रति हजार लिटर १५ रुपये दराने विकणार आहे. कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्रामधून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची खरेदी करण्यासाठी कंपन्या पुढे आल्या असून, या खासगी, निमशासकीय, शासकीय आस्थापनांना विक्री करण्याचा दर निश्चित केला आहे.
मुंबई मलनिस्सारण प्रकल्प भाग २ अंतर्गत कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्राचे काम २०२०मध्ये पूर्ण झाले आहे. त्यानंतर या केंद्राची दैनदिन देखभाल करण्यासाठी पुढील १५ वर्षांच्या कालावधीसाठी सुएझ इंडिया प्रा. लि. कंपनीची निवड केली आहे. प्रकल्पाची क्षमता प्रति दिन ३७ दशलक्ष लिटर एवढी आहे. त्यापैकी १० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर तृतीयक प्रक्रिया केली जाते. यातील सांडपाणी अधिक शुद्ध होऊन त्याचा पुनर्वापर पिण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी म्हणजेच बांधकाम, उद्याने तसेच इतर सफाई कारणासाठी केला जाऊ शकतो.
कुलाबा मलजल प्रकल्पातून प्रक्रिया केलेल्या पाण्यावर प्रति किलो लिटर १२ रुपये खर्च येत आहे. त्यानुसार आता महापालिका प्रति किलोलिटर अर्थात एक हजार लिटर पाण्यासाठी १५ रुपये दर आकारण्याचे निश्चित केले आहे. यासाठी कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्रामधून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याच्या खरेदीसाठी एस. आर. एंटरप्राजेस ही संस्था पुढे आली असून, त्यांना १५ रुपये दराने एक हजार लिटरकरिता दर आकाराला जाणार आहे. एस. आर. एंटरप्राइजेस महिला बचत गट संस्थेला या केंद्रातून सुमारे ३० लाख लिटर प्रतिदिन (तीन किलो लिटर) इतके सांडपाणी प्रक्रिया केलेले पाणी खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे. या संस्थेला तसेच नजीकच्या येणाऱ्या काळात इतर खासगी, निमशासकीय, शासकीय आस्थापनांना याच दराने विक्री केली जाणार आहे.
महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पाचे कंत्राटदार मेसर्स एल ॲण्ड टी लिमिटेड यांना टनेल बोअरिंग यंत्राच्या वापरासाठी दोन दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुरवठा केला होता. २१ रुपये प्रति १,००० लिटर दराने मे ते जून २०२२ या कालावधीत पुरवठा केला.

प्रस्‍ताव स्‍थायी समितीत
मुंबई मेरीटाईम बोर्डाला समुद्रकिनाऱ्यांची धूप रोखण्यासाठी २०२०मध्ये हाती घेतलेल्या टेट्रापॉड टाकण्याच्या कामासाठी कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्रामधून प्रक्रिया केलेले सांडपाणी त्यांच्या मागणीनुसार रुपये २१ प्रति १,००० लिटर दराने पुरविले जाते. दरम्यान, याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

‘कुकडू कू’चा गोंधळ रंगला! ‘सुपर डुपर’चं धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Chakan News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ४२०७ कोटींचा प्रकल्प मार्गी

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सच्या गळाला मोठा मासा; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने पाकिस्तान सुपर लीगला मारली 'लाथ'

SCROLL FOR NEXT