मुंबई

ठाणे महापालिकेवर २,१०० कोटी दायित्वाचे ओझे

CD

२,१०० कोटींची देणी थकली

ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर; करवाढ नाही

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २३ : ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा सहा हजार २२१ कोटी १२ लाख रुपयांचा मूळ अर्थसंकल्प महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना सादर केला. ठाणेकरांवर कोणतीही नवीन करवाढ न लादता आयुक्तांनी सर्वांना दिलासा दिला असला तरी पालिकेची दोन हजार १०० कोटींची देणी थकली असल्याचे या अर्थसंकल्पात ठळकपणे दिसून येत आहे.

महापालिका निवडणूक पार पडली असली तरी स्थायी समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे सोमवारी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी चार वर्षांनंतर महासभेत २०२६-२७ आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्यावर्षी पाच हजार ६२५ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा यामध्ये सुमारे ६०० कोटींची भर पडल्यामुळे अर्थसंकल्प सहा हजार २२१ कोटींवर झेपावला आहे. या अर्थसंकल्पामध्ये जुनेच प्रकल्प नव्याने मांडण्यात आले असून, हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व मदार शासकीय अनुदान आणि कर्जरोखेवर असल्याचे अधोरेखित झाले आहे.

महासभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दायित्वाचा मुद्दा सविस्तरपणे मांडला. पालिकेवर असलेल्या दोन हजार १०० कोटींच्या एकूण दायित्वाचे तीन मुख्य भागांत वर्गीकरण करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. केंद्राच्या विविध योजनांमधील पालिकेचा हिस्सा आणि कामांचे पैसे, राज्याच्या योजनांमधील प्रलंबित देणी आणि पालिकेने हाती घेतलेली विकासकामे आणि कंत्राटदारांच्या देण्यांमुळे दायित्व वाढल्याचे आयुक्त राव यांनी सांगितले. पालिकेवर तातडीने फेडावे लागणारे प्रत्यक्ष दायित्व एक हजार ते एक हजार १०० कोटींच्या दरम्यान आहे.

महसुली तूट
मागील वर्षी पालिकेने एक हजार ९०० कोटींच्या करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु ते पूर्ण करण्यात अपयश आले. पाणीपुरवठा, शहर विकास आणि अग्निशमन यांसारख्या महत्त्वाच्या विभागांच्या उत्पन्नात घट झाल्याचे आयुक्तांनी मान्य केले. महसुली उत्पन्न ३,५२३ कोटींवरून ३,४६१ कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे.

———
आम्ही महसुली उत्पन्न वाढवण्यावर आणि आर्थिक शिस्त राखण्यावर भर देत आहोत. अमृत २.० अंतर्गत केंद्र शासनाकडून ९८.६८ कोटींचे बिनव्याजी अर्थसहाय्य मिळाले आहे, जे एक सकारात्मक पाऊल आहे. दायित्व कमी करून विकासकामांचा दर्जा राखणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

- सौरभ राव, आयुक्त, ठामपा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Price Hike Pune : वाहनधारकांच्या खिशाला कात्री! पुणे, चाकण, पिंपरी-चिंचवड, तळेगावसह हिंजवडीत CNG महागला; मध्यरात्रीपासून 'एवढ्या' रुपयांची दरवाढ लागू

DC vs KKR Live: ५१ चेंडूंवर एकही धाव नाही! दिल्ली कॅपिटल्सची लाजीरवाणी खेळी; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी आवळला फास

Latest Marathi News Update : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Suvendu Adhikari : भीती संपली, आता विश्वासाचं युग! मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच सुवेंदू अधिकारींनी फुंकलं रणशिंग; म्हणाले, 'मोदींनी सांगितल्याप्रमाणे बंगालमध्ये...'

Pune News : रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

SCROLL FOR NEXT