मुंबई

महाराष्ट्र दिनी ‘सावित्रीबाई फुले’ नाट्यगृहात पुन्हा तिसरी घंटा

CD

महाराष्ट्र दिनी ''सावित्रीबाई फुले'' नाट्यगृहात वाजणार तिसरी घंटा!
नूतनीकरण अंतिम टप्प्यात; ३५ कोटींच्या निधीतून कायापालट
डोंबिवली, ता. २४ : मागील नऊ महिन्यांपासून पडदा पडलेल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात महाराष्ट्र दिनापासून पुन्हा नाटकाची तिसरी घंटा होणार आहे. मे २०२५ मध्ये फॉल सिलिंग कोसळल्याच्या घटनेनंतर बंद करण्यात आलेल्या या नाट्यगृहाचे नूतनीकरण आता अंतिम टप्प्यात असून, प्रशासनाने कामाचा वेग वाढवला आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मिळालेल्या निधीतून डोंबिवलीची ही सांस्कृतिक वास्तू आता कात टाकत आहे.

नूतनीकरणासाठी एकूण ३५ कोटी रुपये मंजूर असून पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर संपूर्ण फॉल सिलिंग नव्याने उभारण्यात आले आहे. छताची गळती आणि भिंतींवरील तडे कायमस्वरूपी दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रसिकांसाठी आरामदायी आसनव्यवस्था, नवीन कार्पेट, प्रगत ध्वनी प्रणाली आणि अत्याधुनिक प्रकाशयोजना करण्यात येत आहे. तसेच प्रशस्त प्रसाधनगृहे आणि कॅन्टीनची सुविधाही नव्या स्वरूपात असेल.

नाट्यगृह बंद असल्याने डोंबिवलीतील नाट्यप्रेमींना आणि संस्थांना कल्याणचे ''आचार्य अत्रे'' किंवा ठाण्यातील नाट्यगृहांकडे धाव घ्यावी लागत होती. यामुळे वेळ आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. "फुले नाट्यगृह ही केवळ वास्तू नसून डोंबिवलीच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे," अशी भावना रसिक प्रेक्षक प्राजक्ता ओक यांनी व्यक्त केली, तर "आपल्या शहरात पुन्हा नाटकं पाहायला मिळतील याचा आनंद मोठा आहे," असे चैतन्य कुलकर्णी या युवकाने सांगितले.

स्थानिक रंगकर्मींना हक्काचे व्यासपीठ
२००७ मध्ये सुरू झालेल्या या नाट्यगृहाने अनेक दर्जेदार प्रयोग आणि कार्यक्रमांचे साक्षीदार होण्याचे भाग्य मिळवले आहे. मध्यंतरी देखभालीअभावी या वास्तूची अवस्था खालावली होती. आता महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर नव्या रूपात सुरू होणारे हे नाट्यगृह स्थानिक रंगकर्मी आणि नवोदित कलाकारांसाठी पुन्हा एकदा हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे. प्रशासनाच्या दाव्यानुसार, काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर भर दिला जात असून, मे महिन्याच्या सुरुवातीलाच डोंबिवलीकर पुन्हा एकदा आपल्या लाडक्या नाट्यगृहात नाटकांचा आनंद घेऊ शकतील.

आधुनिक सुविधा
सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आता प्रेक्षकांसाठी अत्याधुनिक प्रकाशयोजना आणि प्रगत ध्वनी प्रणाली बसवण्यात येणार आहे. आसनव्यवस्था अधिक आरामदायी करण्यात आली असून संपूर्ण सभागृहात नवीन कार्पेट टाकले जाणार आहे. यासोबतच प्रशस्त प्रसाधनगृहे आणि अद्ययावत कॅन्टीनची सोय उपलब्ध होईल. विशेष म्हणजे, पावसाळ्यात होणारी छताची गळती रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष तांत्रिक उपाययोजना केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bomb Case: सीसीटीव्हीतील व्यक्ती स्वतःहून पोलिसांसमोर; पण निघाला MR, बॉम्ब प्रकरणाशी काहीही संबंध नाही!

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनार वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र चालवत असल्याचं समोर

Breaking : हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव पंजाब किंग्सच्या सामन्याला मुकणार; Mumbai Indians चं नेतृत्व कोण करणार?

Raj Thackeray: केंद्राचा एकछत्री कारभार विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला... 'NEET' पेपरफुटीवर राज ठाकरेंचा संताप, सरकारवर जोरदार हल्ला

Yerwada Prison Escape : येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी फरार; आठवड्यातील दुसरी घटना, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT