मुंबई

महिलांना प्रौढ साक्षरतेद्वारे पदवी प्रदान

CD

महिलांना प्रौढ साक्षरतेद्वारे पदवी प्रदान

विक्रमगड, ता. २४ : रोटरी क्लब ऑफ बॉम्बे, सीडीएसएल आणि दिगंत स्वराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या ‘दिशा पठण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत प्रौढ साक्षरतेच्या माध्यमातून दुर्गम आणि आदिवासी भागातील सुमारे दोन हजार महिलांना पदवी प्रदान करण्यात आली. विक्रमगडच्या एस. के. हॉटेलमधील या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, वाडा, विक्रमगड आणि पालघर येथील महिलांची उपस्थिती होती.
या सोहळ्यानिमित्त हजारो महिलांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळाली. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर शिक्षणापासून वंचित राहिलेल्या महिलांनी पुन्हा एकदा शिक्षणाचा ध्यास घेतला आणि तो टप्पा यशस्वीपणे गाठला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरियन कल्याण बॅनर्जी (वापी) आणि प्रा. विचारे यांनी भूषविले. या वेळी पीडीजी रोटरियन संदीप अग्रवाल, इमीडिएट माजी अध्यक्ष विनीत नगर, अध्यक्ष बिमल मेहता तसेच प्रकल्प समन्वयक रुनीत उपस्थित होत्या. सीडीएसएलचे मुख्य वित्त अधिकारी, इतर पदाधिकारी तसेच रोटरी क्लब ऑफ बॉम्बे, पालघर आणि वाडा येथील अनेक सदस्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मान्यवरांनी आपल्या भाषणांतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना प्रौढ साक्षरता ही सामाजिक परिवर्तनाची प्रभावी चळवळ असल्याचे सांगितले. त्यांनी महिलांच्या जिद्दीचे कौतुक करीत पुढील शिक्षणासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची ग्वाही दिली.
‘दिशा पठण’ हा प्रकल्प विशेषतः अशा महिलांसाठी राबविण्यात आला, ज्यांना लहानपणी आर्थिक, सामाजिक किंवा भौगोलिक कारणांमुळे शिक्षणाची संधी मिळाली नाही.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश
महिलांना वाचन, लेखन व गणिताची प्राथमिक कौशल्ये देणे होते. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हाच प्रमुख उद्देश या संकल्पनेचा होता. अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत जवळपास दोन हजार महिलांना साक्षर करण्यात आले. ही बाब अत्यंत उल्लेखनीय अशी ठरली तसेच या कालावधीत नियमित वर्ग, सोपी शिक्षणपद्धती आणि समुदायाचा सक्रिय सहभाग यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.
---------------

सांस्कृतिक कार्यक्रम व अनुभव कथन
कार्यक्रमात शिक्षणाच्या महत्त्वावर आधारित एक प्रभावी नाटिका सादर करण्यात आली, ज्यातून अशिक्षणामुळे येणाऱ्या अडचणी आणि साक्षरतेमुळे मिळणारे स्वातंत्र्य प्रभावीपणे मांडण्यात आले.
प्रेरिका नैनिता ठाकरे यांनी आपल्या अनुभवांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले, की या महिलांमध्ये शिकण्याची जिद्द आणि चिकाटी अफाट आहे. त्यांनी अनेक अडचणींवर मात करून शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच पदवीप्राप्त प्रियांका भावर यांनी या वेळी पुढेही शिक्षण सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या निर्धाराने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

‘कुकडू कू’चा गोंधळ रंगला! ‘सुपर डुपर’चं धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Chakan News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ४२०७ कोटींचा प्रकल्प मार्गी

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सच्या गळाला मोठा मासा; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने पाकिस्तान सुपर लीगला मारली 'लाथ'

SCROLL FOR NEXT