आई एकविरा देवीच्या दरबारी रोह्यातून पाच पदयात्रा रवाना
रोहा ता.२४ (बातमीदार) : रोहा (ता. २४) : लोणावळा जवळील कार्ला लेणी परिसरातील आई एकविरा देवीच्या चैत्रोत्सवातील पालखी सोहळ्यासाठी रोहा तालुक्यातून दरवर्षीप्रमाणे यंदाही शेकडो भक्तांनी पदयात्रा सुरू केली आहे. सोमवारी (ता. २३) विविध मंडळांच्या माध्यमातून सुमारे ६०० भक्त कार्ला डोंगराच्या दिशेने रवाना झाले. येत्या बुधवारी (ता. २५ मार्च) आई एकविरा देवीचा पालखी उत्सव साजरा होणार आहे.
रोहा शहरातील धनगर आळी मंडळ, रोठखुर्द येथील जय भवानी मंडळ, झोलांबे येथील हनुमान सेवा मंडळ, खारापटी येथील आई एकविरा पालखी पदयात्रा मंडळ आणि निडी येथील पदयात्रा मंडळ अशा पाच मंडळांच्या माध्यमातून ही पदयात्रा काढण्यात आली आहे.
भक्त दोन दिवस पायी प्रवास करत वाकण, पाली, रासळ, जांभुळपाडा, खोपोली, खंडाळा आणि लोणावळा मार्गे कार्ला गडावर पोहोचतात. या प्रवासात भजन, नामस्मरण आणि विविध धार्मिक कार्यक्रम होतात. परतीच्या प्रवासात रोहा येथे पालखीचे स्वागत करण्यात येते. काही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन तसेच धावीर महाराज मंदिर येथे दर्शन घेतले जाते.
फोटो कॅप्शन
रोहा : आई एकविरा देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना नाष्ट्याची सोय केल्यानंतर देवीचे दर्शन घेताना आष्टीवकर कुटुंब व रोहेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.