जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय बजरंग रोहा संघाची दमदार कामगिरी
रोहा, ता. २४ (बातमीदार) : तालुक्यातील दापोली येथे २० मार्च रोजी गावदेवी क्रीडा मंडळाच्या वतीने जाखमाता उत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय बजरंग, रोहा संघाने उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद पटकावले.
अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात जय बजरंग, रोहा संघाने दर्यावर्दी नागांव बंदर संघावर मात करून प्रथम क्रमांक मिळवला. विजेत्या संघाला ३३,३३३ रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेत यशवंतखार येथील भैरवनाथ संघाने तृतीय, तर भातसई येथील स्वयंभू संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. वैयक्तिक कामगिरीत जय बजरंग रोहाचा राकेश गायकवाड याला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळाला. अंतिम सामना अत्यंत रंगतदार ठरला असून जय बजरंग रोहाच्या दमदार कामगिरीमुळे प्रेक्षकांना उत्कृष्ट खेळ पाहायला मिळाला. संघाच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
चौकट
वैयक्तिक कामगिरी
आशिष मोरे (भातसई) – उत्कृष्ट चढाई
सनी भगत (यशवंतखार) – उत्कृष्ट पकड
मंथन सुर्वे (नांदगाव) – पब्लिक हिरो
फोटो कॅप्शन : दापोली येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत अंतिम विजेता जय बजरंग रोहा संघाला पारितोषिक देताना मान्यवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.