कल्याणमध्ये रिक्षा चालकांचा एल्गार
''ई-रिक्षा'' आणि ''बाईक टॅक्सी''वर बंदीची मागणी; संघर्ष कृती समितीचे आरटीओ प्रशासनाला निवेदन
कल्याण, ता. २४ (वार्ताहर): रिक्षा चालकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पुकारलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून, कल्याणमध्येही टॅक्सी संघर्ष कृती समितीच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. शशांक राव आणि विलास भालेकर यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेल्या या आंदोलनांतर्गत, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
''धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळा''त नोंदणीसाठी रिक्षा चालकांवर सक्ती करू नये. तसेच, या मंडळातील प्रवेश शुल्क आणि वार्षिक शुल्क पूर्णपणे रद्द करून नि:शुल्क नोंदणी करण्यात यावी. राज्य सरकारने सामान्य ऑटोरिक्षा परवाना वितरणावर स्थगिती आणली असताना, इलेक्ट्रीक आणि ई-रिक्षांना मात्र सवलत दिली आहे. सरकारच्या या दुटप्पी भूमिकेचा निषेध करत, ई-रिक्षांच्या नोंदणीवर तातडीने बंदी आणण्याची मागणी समितीने केली आहे.
अवैध बाईक टॅक्सी
शहरात खाजगी कंपन्यांकडून बेकायदेशीरपणे ''बाईक टॅक्सी'' सेवा सुरू आहे. यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका असून, रिक्षा चालकांच्या व्यवसायावरही गदा येत आहे. अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करून बंदी घालावी.
प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा
टॅक्सी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष महेंद्र मिश्रा, कार्याध्यक्ष विल्सन काळपुंड, उपाध्यक्ष मोहन पाठारे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सोपवले. "या मागण्या रिक्षा चालकांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असून, प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करावा," अशी अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे. जर येत्या काही दिवसांत यावर ठोस निर्णय झाला नाही, तर संघटना उपोषण करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.