मुंबई

वृद्धांना लुटणारी टोळी गजाआड

CD

नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : आमच्या शेठला मुलगा झाला असून पुढे साड्यांचे वाटप सुरू आहे, असे सांगून ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या त्रिकूटाला रबाळे पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीने गुजरातसह मुंबईतदेखील अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी या त्रिकूटाची कसून चौकशी सुरू केली आहे.

२४ डिसेंबर २०२५ला दुपारच्या सुमारास रबाळे गावात राहणाऱ्या अनुसया दत्ता शिंदे (५९) या कामावरून घरी जात होत्या. या वेळी वाटेत काही व्यक्तींनी त्यांना गाठून आमच्या शेठला मुलगा झाला आहे. पुढे गरिबांना साड्या वाटल्या जात आहेत. तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने काढून पिशवीत ठेवा, असे सांगून त्यांचे लक्ष विचलित केले. त्यानंतर त्यांनी हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील दीड लाखाचे सोन्याचे दागिने लुबाडून पलायन केले. या घटनेचे गांभीर्य ओळखून रबाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दीपक खरात आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती.

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी करून तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयितांचा माग काढला. संशयित आरोपी कोपरखैरणे येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अशोक विठ्ठल काळे (२२), विष्णू शिवाजी पवार (२७) आणि लखन ऊर्फ कार्तिक दारासिंग काळे (१९) यांना ताब्यात घेतले.

गुजरातमध्येही चोरी
पोलिसांनी या त्रिकूटाकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांनी केवळ नवी मुंबईतच नव्हे, तर ठाणे, मुंबई शहर आणि थेट गुजरात राज्यातही अशाच प्रकारे अनेक लोकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ही टोळी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. या संशयितांकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

Donald Trump: व्हाईट हाउसमध्ये वैदिक मंत्रोच्चारण; बीएपीएस स्वयंसेवकांनी वैश्विक शांततेसाठी केली प्रार्थना

RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन'

SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

SCROLL FOR NEXT