मुंबई

कुख्यात चैन स्नॅचिंग आरोपी पोलिसांच्या ताब्यात

CD

पोलिसांच्या जाळ्यात अडकला चोर

आरोपींवर १०६ हून अधिक गुन्ह्यांची नोंद

नालासोपारा, ता. २४ (बातमीदार) : नालासोपारा परिसरातील चेन स्नॅचिंग प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी उलगडा करत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. आरोपींवर १०६ हून अधिक गुन्हे दाखल असून, चोरीस गेलेली सोन्याची चेन गुजरातमधून जप्त करण्यात आली आहे.
बोळिंज पोलिस ठाण्यातील चेन स्नॅचिंग प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत दोन आरोपींना अटक केली. अतिफ मोबीन अन्सारी ऊर्फ मेंटल (४३) आणि साजीद शेख ऊर्फ बडा साजीद अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. १९ जानेवारीला विरार पश्चिम येथील कीर्ती पाटील यांची १३ ग्रॅम सोन्याची चेन हिसकावण्यात आली होती. या घटनेत त्यांना दुखापतही झाली होती. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढून त्यांना अटक केली. चोरीस गेलेली १२.३०० ग्रॅम सोन्याची चेन गुजरातमधील नवसारी येथून जप्त करण्यात आली. आरोपींवर मुंबई परिसरात १०६ हून अधिक गुन्हे दाखल असून, त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC Success Story : चाळीशीनंतर पुन्हा धरली शाळेची वाट! ८१ महिलांनी घडवला इतिहास, जावळीच्या महिलांची प्रेरणादायी यशोगाथा..

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी त्रुटी; ताफ्याच्या मार्गावरच सापडली स्फोटकं, एकाला अटक

कुर्रर्र! सूर्यकुमार यादवच्या लेकीचं नाव समजलं का? बापमाणसाने ठेवलं भारी नाव... जाणून घ्या अर्थ...

IPL 2026 Playoff: RCBविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात येईल का? काय सांगतंय गणित?

Mumbai News: 'गिल्बर्ट हिल'चा धारावी मॉडेलनुसार कायापालट होणार? रहिवाशांचा ३५० चौरस फुटांच्या घरासाठी आग्रह​

SCROLL FOR NEXT