मिठी नदी सुधारण्याची कामे प्रगतिपथावर
संरक्षक भिंतीचे ९५ टक्के काम पूर्ण; चार टप्प्यांचा आराखडा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाचे, संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुमारे ९५ टक्के पूर्ण झाले असून, नदीच्या विकास आणि प्रदूषण नियंत्रणाच्या आराखड्याची अंमलबजावणी चार टप्प्यांमध्ये करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.
मिठी नदीच्या प्रदूषणाची मगरमिठी देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेला वर्षानुवर्षे सोडविता आलेली नाही. मुंबई महापालिका आणि एमएमआरडीए प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा फटका मिठी नदीच्या पुनर्विकासाला बसला असल्याचे दिसून येत आहे. या नदीत सांडपाणी, औद्योगिक कचरा, रासायनिक पाणी, प्लॅस्टिक, मृत जनावरे, टाकाऊ वस्तू टाकल्याने नदी प्रदूषित झाली झाली. पवई येथील फिल्टरपाडा येथील डब्ल्यूएसपी कम्पाउंड, मलजल प्रक्रिया केंद्र जानेवारी २०२३ पासून कार्यान्वित करण्यात आले आहे. येथील डब्ल्यूएसपी कम्पाउंड, पवई ते सीएसएमटी रस्ता, कुर्ला येथे संरक्षक भिंत, सेवा रस्ता, इंटरसेप्टर बांधण्याचे आणि मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे ६४ टक्के काम पूर्ण झाले आहे. सीएसएमटी रोड, कुर्ला ते माहीम कॉजवेदरम्यान (वाकोला नदीसह) संरक्षण भिंत व सेवा रस्त्याचे काम करणे, मलनिस्सारण वाहिनी टाकणे, गेट पंप्ससह (पंपिंग यंत्रणेसह फ्लड गेट्स) इंटरसेप्टर बांधणे व इतर संबंधित कामांसाठी स्वीकृती प्रत देण्यात आहे आहे. बापट नाला ते सफेद पूल नाला ते धारावी मलजल प्रक्रिया केंद्र येथील बोगद्याचे काम ९७ टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
१,२८६ कोटींचा निधी
मुंबई महापालिकेने मिठी नदीकरिता २०२६-२७च्या अर्थसंकल्पात नदीच्या विकास आणि प्रदूषण विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी सुमारे १,२८६.२५ कोटी इतकी तरतूद केली आहे. या नियोजनानुसार महापालिकेकडून कामे हाती घेतली जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.