सासू-सासऱ्यांनाही नुकसानभरपाईचा अधिकार
सुनेचा अपघाती मृत्यू; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : एखाद्या विवाहित महिलेचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईवडिलांसह सासू-सासरेही नुकसानभरपाईसाठी दावा दाखल करू शकतात. तसेच तो मिळण्याचा त्यांनाही अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच उच्च न्यायालयाने दिला.
भारतीय समाजात विवाहानंतरही मुलगी स्वतःच्या आई-वडिलांची आणि सासू-सासऱ्यांचीही काळजी घेते. त्यामुळे मोटार वाहन कायद्यांतर्गत आई-वडिलांच्या या दोन्ही बाजूंना परावलंबी म्हणूनच मानले जाणे आवश्यक आहे. अपीलकर्त्यांना त्यांच्या मुलाच्या आणि नातवाच्या मृत्यूपोटी यापूर्वीच काही रक्कम मिळाली आहे. केवळ या कारणास्तव त्यांना नुकसानभरपाई नाकारणे योग्य म्हणता येणार नाही, असे न्या. आर. एम. जोशी यांच्या एकलपीठाने अपीलकर्त्यांना दिलासा देताना नमूद केले. तसेच न्यायाधिकरणाने भरपाईच्या रकमेचे वाटप निश्चित करताना या वस्तुस्थितीचा विचार करायला हवा होता, असेही अधोरेखित करून न्यायालयाने लुईझाच्या आई-वडिलांना मंजूर केलेल्या भरपाईपैकी एकतृतीयांश हिस्सा अपीलकर्त्या सासू-सासऱ्यांना देण्याचे आदेश दिले.
प्रकरण काय?
नायगाव येथील मसिलमणी चेट्टियार दाम्पत्याची सून लुईझा ही १ जुलै २०२१ला पती जोकिम आणि मुलासह पुण्याहून मुंबईला येत असताना खोपोलीजवळ ट्रेलरने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघात लुईझा यांचा खोपोली सरकारी रुग्णालयात नेतानाच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. अपीलकर्ते चेट्टियार दाम्पत्य हे सुनेवर अवलंबून होते. त्यामुळे त्यांनाही भरपाई मिळायला हवी होती, परंतु मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने त्यांना भरपाई देण्यापासून वंचित ठेवले. त्या निर्णयाला चेट्टियार दाम्पत्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
..
आई-वडिलांचा युक्तिवाद
रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेली चेट्टियार दाम्पत्याची सून लुईझाचे आई-वडील जॉन रॉड्रिग्ज आणि परपेचुआ जॉन रॉड्रिग्ज यांनाच न्यायाधिकरणाने १.१९ कोटी रुपयांची भरपाई दिली. त्यावर त्यांचा आक्षेप होता. लुईझाच्या आई-वडिलांनी अपीलकर्त्या दाम्पत्याच्या दाव्याला विरोध केला आणि सासू-सासरे हे कायदेशीर वारसदार नसतात, असा प्रतिदावा केला. शिवाय अपीलकर्त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या आणि नातवाच्या मृत्यूची भरपाई व मुलाच्या नोकरीशी संबंधित इतर लाभ मिळाल्याचेही लुईझाच्या आई-वडिलांनी युक्तिवाद करताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.