मुंबई

म्हाडा मुंबईत घर बांधणीवर ४५०० कोटींचा खर्च करणार

CD

म्हाडा मुंबईत घरबांधणीवर ४,५०० कोटींचा खर्च करणार
अर्थसंकल्प शुक्रवारी मांडणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाकडून २०२६-२७ या आर्थिक वर्षात मुंबईत मोठ्या प्रमाणात घरे बांधण्यावर लक्ष दिले जाणार आहे. म्हाडाकडून पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प शुक्रवारी (ता. २७) प्राधिकरणासमोर ठेवला जाणार आहे. त्यामध्ये मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, पहाडी गोरेगाव, जोगेश्वरी पीएमजीपी वसाहत पुनर्विकास प्रकल्पासाठीसह विविध प्रकल्पांकरिता ४,५०० कोटींहून अधिक निधीची तरतूद केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
म्हाडाची मुंबईसह राज्यभरात विभागीय मंडळे असून त्यांच्याकडून सामान्यांसाठी जास्तीत जास्त घरे कशी उपलब्ध करून देण्यात येतील, यावर भर दिला जातो. त्यासाठी वेगवेगळ्या मंडळांकडून येणारे उत्पन्न आणि त्यांच्याकडून हाती घेतल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी निधीची तरतूद केली जाते. त्यानुसार म्हाडाच्या अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून मुंबईत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबरोबरच पहाडी गोरेगाव, जोगेश्वरीच्या पीएमजीपी पुनर्विकास प्रकल्पासह अन्य ठिकाणी घरांची निर्मिती करण्यासाठी मुबलक निधीची तरतूद केली जाणार आहे. हा अर्थसंकल्प म्हाडा प्राधिकरणासमोर मांडल्यानंतर गृहनिर्माण विभागाला सादर केला जातो. म्हाडाकडून मुंबईत घरबांधणीसाठी मोठ्या निधीची तरतूद केली जाणार असल्याने पुढील काळात मुंबई शहर आणि उपनगरात अनेकांचे गृहस्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

‘कुकडू कू’चा गोंधळ रंगला! ‘सुपर डुपर’चं धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Chakan News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ४२०७ कोटींचा प्रकल्प मार्गी

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सच्या गळाला मोठा मासा; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने पाकिस्तान सुपर लीगला मारली 'लाथ'

SCROLL FOR NEXT