मुंबई

‘मराठी’साठी स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार

CD

‘मराठी’साठी स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार
सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण केलेल्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील ६५ चित्रपट आणि कोविड काळातील ९८ चित्रपटांना एकूण २४ कोटी १० लाख अर्थसहाय्य मंगळवारी (ता. २४) वितरित करण्यात आले. या वेळी मुंबईत केवळ मराठीसाठी स्वतंत्र चित्रनाट्यगृह लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य योजनेचा धनादेश वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर आणि विविध चित्रपटांचे निर्माते उपस्थित होते. या वेळी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘श्यामची आई’ या चित्रपटास ७९ लाखांचा निधी वितरित करण्यात आला. तसेच अपर्णा हौसिंग, शीतल शेट्टी, स्नेहल तरडे या दिग्दर्शक महिलांना प्रत्येकी पाच लाख प्रोत्साहन निधी देऊन गौरविण्यात आले. मंत्री शेलार म्हणाले, की महाराष्ट्र हा वैभवसंपन्न व प्रतिभासंपन्न महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात कला, साहित्य, जागरूक नागरिक, उत्कृष्ट कलावंत या सगळ्यांची पेरणी आहे. दर्जेदार मराठी सिनेमा निर्माण व्हावा, यासाठी प्रत्येक टप्प्यावर सरकार आपले काम करीत आहे. मराठी क्षेत्रातील निर्मात्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने योजना कार्यान्वित करीत असल्याचे शेलार यांनी सांगितले. त्यामध्ये ‘अ’ दर्जासाठी ४० लाख, ‘ब’ दर्जाचे चित्रपटांना ३० लाख तर ‘क’ दर्जाच्या चित्रपटांना १० लाख अनुदान वाटप करण्यात येत आहे. यामध्ये सरकारी हस्तक्षेप नसावा, यासाठी स्वतंत्र पारदर्शक प्रणाली असावी, चित्रपटाचे परीक्षण करण्यासाठी २८ सदस्यांची समिती गठित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

..
४९६ चित्रपटांचे परीक्षण
२०१८ ते २०२२ या कोविड कालावधीतील सेन्सरप्राप्त चित्रपटांना चार कोटी ९० लाख देण्यात येत असल्याचेही शेलार यांनी सांगितले. चित्रपटाचे परीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने २०२३ ते २०२६ या कालावधीमध्ये ४९६ चित्रपटांची परीक्षण केले आहे. या माध्यमातून मराठी चित्रपटांचा सार आपल्यासमोर आणलेला आहे. त्यातून गुणवत्तापूर्ण चित्रपटांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे शेलार यांनी सांगितले.
..
मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारचा भर आहे. फिल्मसिटीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपट पाहण्याची सवय लागावी, यासाठीही शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
- ॲड. आशीष शेलार, सांस्कृतिक कार्य मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणे वाढली; मानवी तस्करी रोखण्यासाठी संसदेत आवाज

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : लग्न जुळत नसल्याने युवकाने संपवलं जीवन

Solapur News : सावळेश्वर टोल नाक्यावर चालकाला बेदम मारहाण; वाहतूक ठप्प, तणावाचे वातावरण

SCROLL FOR NEXT