मुंबई

ठाण्यात रामनवमीची जल्लोषात तयारी

CD

ठाण्यात रामनवमीची जल्लोषात तयारी
धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
ठाणे, ता. २५ (बातमीदार) : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण ठाणे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ‘जय श्री राम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण या उत्सवात सहभागी होताना दिसत आहेत. विशेषतः वागळे इस्टेटमधील इंदिरानगर परिसरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत आकर्षक लायटिंग आणि देखावे साकारले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही वागळे समितीतर्फे शोभायात्रेचे आयोजन केले आहे. यंदाचे ११ वे वर्ष असून यामध्ये श्रीरामांच्या वनवासातील व रामायणातील विविध प्रसंगांचे सादरीकरण करून युवा पिढीला रामायणाचा इतिहास समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हनुमानाने संजीवनी पर्वत आणण्यासाठी उंचावर उडणारे हनुमान, खाली मुर्चित अवस्थेत असलेले लक्ष्मण आणि त्यांच्या जवळ बसलेले राम हा प्रसंग अत्यंत सुंदररित्या सादर करण्यात आला आहे. या भावनिक दृश्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. रंगीबेरंगी सजावट, फुलांची आरास आणि सजीव वाटणाऱ्या मूर्तींमुळे संपूर्ण देखावा जिवंत भासत आहे.

इतिहास, संस्कृती आणि भक्तीचा सुंदर संगम
याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे दर्शन घडवणारा देखावा देखील विशेष आकर्षण ठरत आहे. घोड्यावर आरूढ असलेली महाराजांची भव्य अश्वारूढ मूर्ती, आजूबाजूला रणशिंग वाजवणारे सैनिक जणू स्वराज्याच्या पराक्रमाची आठवण करून देत आहेत. या देखाव्यांमधून इतिहास, संस्कृती आणि भक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

SCROLL FOR NEXT