मुंबई

कचरावेचक महिलांच्या मुलांसाठी ‘उडान’ शिबिर

CD

कचरावेचक महिलांच्या मुलांसाठी ‘उडान’ शिबिर
आत्मविश्वास, समानता व विज्ञाननिष्ठेचा प्रभावी संदेश
पनवेल, ता. २५ (वार्ताहर) : स्त्रीमुक्ती संघटनेतर्फे नवी मुंबईतील कचरावेचक महिलांच्या मुलांसाठी दोनदिवसीय निवासी ‘उडान’ शिबिराचे आयोजन केले होते. पनवेल नेरे येथील कुष्ठरोग निवारण समिती येथे हे शिबिर पार पडले. या शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक भान जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या शिबिरात कळवा, दिघा, रबाळे, इंदिरानगर, बोनसरी, नवशील व पनवेल परिसरातील कचरावेचक महिलांची नववी ते महाविद्यालयीन वयोगटातील ५० कुमारवयीन मुले-मुली सहभागी झाली होती. शिबिराच्या पहिल्या दिवशी समुपदेशक अरमान सिंग व रिया भाटिया यांनी संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले. विविध खेळ आणि उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी आपले विचार मोकळेपणाने मांडले. स्त्री-पुरुष समानता या विषयावर स्त्रीमुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदूम यांनी मार्गदर्शन करीत वेशभूषा, वेळेची बंधने, करिअर संधी आणि उच्च शिक्षण या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच समाजात समानतेची गरज त्यांनी ठळकपणे मांडली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या वंदना शिंदे यांनी शिबिरात दोन दिवस सहभागी होत विद्यार्थ्यांना चळवळीची गाणी शिकवली. जादूटोणा, उपास-तापास, अंगात येणे, भानामती यांसारख्या अंधश्रद्धांविषयी प्रयोगांच्या माध्यमातून भोंदूबाबांकडून होणाऱ्या फसवणुकीचे वास्तव त्यांनी उलगडले. अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख डॉ. अजित मगदूम यांनी ‘व्यसन : उद्भव व उपचार’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी घरगुती व परिसरातील व्यसनांबाबतचे अनुभव शेअर केले. खेळ व ध्यान यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा मार्ग त्यांनी सुचवला. रात्री विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शन सादर करीत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले.

कुष्ठरोग निवारण समितीच्या विविध प्रकल्पांची माहिती
शिबिर प्रमुख निळकंठ कोळी यांनी कुष्ठरोग निवारण समितीच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. १२० एकर परिसरातील कुष्ठरोग आश्रम, वृद्धाश्रम व दिव्यांगांसाठीच्या युनिटला विद्यार्थ्यांनी भेट दिली. तसेच हातमाग प्रकल्प, शेतीतील उपक्रम यांची माहिती घेत आजी-आजोबांशी संवाद साधला. अन्वय व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते मनोहर तांडेल यांनी खगोलशास्त्र व मानवी जीवनातील विसंगती या विषयावर सादरीकरण केले. कुंडली, भविष्य, ग्रह-ताऱ्यांवरील अंधविश्वास यावर त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

Sugar-Free Thandai Recipe: उन्हाळ्यात सरबत पिऊन कंटाळा आलाय? मग ट्राय करा ही 'शुगरफ्री थंडाई'; फक्त 5 मिनिटांत तयार होणारी, झटपट आणि सोपी रेसिपी!

SCROLL FOR NEXT