रस्ता रुंदीकरण बाधितांना त्यांच्याच परिसरात घरे
मुंबई, ता. २५ : कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेज परिसरातील सिंह इस्टेटमध्ये १२० फूट रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. या रुंदीकरणावेळी प्रकल्पबाधित झालेल्या नागरिकांना त्यांच्याच परिसरात हक्काची घरे मिळाली आहेत. स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे तसेच नगरसेवक राज सुर्वे यांच्या पाठपुराव्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला. या बाधितांना लोखंडवाला येथील वेस्टा इमारतीतील घरांचे वाटप नुकतेच आमदार सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.
रस्ता व नाला रुंदीकरणातील बाधितांना आपली हक्काची घरे मिळवताना अनेकदा असंख्य गोष्टींचा सामना करावा लागतो. आपल्याला घरे मिळतील की नाही. मिळालीच तर कुठे मिळतील, याबाबत अनिश्चितता असते. सिंह इस्टेटमधील नागरिकांच्या मनातही असेच अनेक प्रश्न होते. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी त्यांना थेट माहूर येथे घरे मिळतील, असे सांगितल्याने त्यांना हा विषय पटला नाही. त्यामुळे त्या रहिवाशांनी आमदार प्रकाश सुर्वे यांची भेट घेत आपल्याला याच परिसरात घरे देण्यात यावी, अशी मागणी केली. या भेटीनंतर सुर्वे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे याप्रकरणी दाद मागत या रहिवाशांसाठी त्याच परिसरात घरे मंजूर करून घेतली.
त्यानुसार महापालिका अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करीत लॉटरी प्रक्रिया पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना ठाकूर व्हिलेज परिसरात घरे प्राप्त करून दिली. या वेळी पालिकेच्या आर. दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त आरती गोळेकर, शाखाप्रमुख सचिन केळकर, हेमलता नायडू आदी उपस्थित होते. या वेळी सिंह इस्टेटमधील रहिवाशांनी आपल्याला हक्काची घरे मिळाल्याने आमदार प्रकाश सुर्वे यांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.