मुंबई

वाडा पोलिस संशयाच्या घेऱ्यात

CD

वाडा पोलिस संशयाच्या घेऱ्यात
भूसुरुंग स्फोटातील आरोपींना मदतीचा ठपका
वाडा, ता.२५ (बातमीदार)ः तालुक्यातील खरीवली गावात दगड उत्खननाकरिता विनापरवाना भूसुरुंगाचे स्फोट झाले होते. या प्रकरणातील आरोपींना जामीनासाठी वाडा पोलिसांनी मदत केल्याची तक्रार खरीवली ग्रामस्थांच्या पालघरच्या पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
तालुक्यातील खरीवली गावालगत असलेल्या सर्वे नंबर २११ च्या बाजूने रिलायन्स गॅस गेली आहे. या वाहिनीलगत मोठ्या प्रमाणावर सुरुंग स्फोट करून दगडाचे उत्खनन केल्याने धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात तहसीलदारांकडे लेखी तक्रार करत कारवाईची मागणी करण्यात आली होती. खानिवली महसूल विभागाने वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी संदीप पाटील, संदीप बागुल, मे.जी.आर. इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. तर पोलिस तपासात खरीवलीचे उपसरपंच महेश जाधव गुन्ह्यात सहभागी आहेत. सुरुंग स्फोटासारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेली असताना आरोपींना जामीन मिळाल्याने पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे.
--------------------------------------------
गुन्ह्याचा तपास अधिकारी नसून या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही.
- नामदेव गवळी, पोलिस हवालदार, वाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताची ३७ जहाजं होर्मुझमध्ये अडकून, देशात कच्च्या तेलाचा साठ किती? खतांचे काय? पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितली आकडेवारी

Pune Land Action: शर्तभंग झालेल्या ३० भूखंडांवर सरकारची मोठी कारवाई; पुणे-पिंपरीत कोट्यवधींच्या जमिनी ताब्यात, २०० कोटींची मालमत्ता जप्त

Latest Marathi News Live Update : चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा महामोर्चा

देऊळ बंद २ ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, 5 दिवसात कमावले तब्बल 'इतके कोटी'

Chhatrapati Sambhajinagar: पैठणचे गोदापात्र पडले कोरडेठाक; घाण, कचरा सडून परिसरात दुर्गंधी; धार्मिक विधींना मोठा फटका

SCROLL FOR NEXT