मुंबई

जलवाहिनीची गळती थांबली

CD

पाणीपुरवठा विभागाच्या तत्परतेमुळे जलनासाडी रोखली
विठ्ठलवाडीतील फुटलेली जलवाहिनी दुरुस्त

कल्याण, ता. २५ (बातमीदार) : विठ्ठलवाडी येथील श्रीराम टॉकीज परिसरातील साईबाबा कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पाण्याची गळती रोखण्यात पाणीपुरवठा विभागाला यश आले आहे. कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे उन्हाळ्याच्या तोंडावर वाया जाणारे शेकडो लिटर शुद्ध पाणी वाचवण्यात आले असून, नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.

साईबाबा कॉलनीतील गल्ली क्रमांक १०/११ मध्ये पिण्याच्या पाण्याची एक लहान पाइपलाइन फुटली होती. यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेकडो लिटर शुद्ध पाणी रस्त्यावर वाहून जात होते. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती असताना होणाऱ्या या नासाडीमुळे स्थानिक रहिवासी चिंता व्यक्त करत होते. रहिवाशांनी या गंभीर समस्येबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेताच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी मयूर शिंदे आणि चौधरी यांनी तातडीने कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. भर उन्हात कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून फुटलेली पाइपलाइन दुरुस्त केली आणि पाण्याची गळती पूर्णपणे थांबवली.

कामगिरीचे कौतुक
दुरुस्तीनंतर परिसरातील पाणीपुरवठा आता पूर्ववत आणि सुरळीत झाला आहे. प्रशासनाच्या या जलद कामगिरीमुळे पालिकेच्या कार्यक्षमतेवर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Sugar-Free Thandai Recipe: उन्हाळ्यात सरबत पिऊन कंटाळा आलाय? मग ट्राय करा ही 'शुगरफ्री थंडाई'; फक्त 5 मिनिटांत तयार होणारी, झटपट आणि सोपी रेसिपी!

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

SCROLL FOR NEXT