मुंबई

पनवेल शहर वाहतूक शाखेकडून विद्यार्थ्यांना वाहतूक जनजागृती

CD

पनवेल शहर वाहतूक शाखेकडून विद्यार्थ्यांना वाहतूक जनजागृती
कामोठे, ता.२५ (बातमीदार) : पनवेल शहर वाहतूक शाखेने शहरातील व्ही के हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी वाहतूक जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाचे धडे दिले. या कार्यक्रमास शाळेतील सुमारे २०० विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, सुरक्षितता आणि शिस्त याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कवितांच्या माध्यमातून आणि तंत्रज्ञानाच्या सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे समजावून दिले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी विद्यार्थ्यांना वाहतुकीसंबंधी माहितीपर पुस्तके वाटप करण्यात आले. वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आणि नियमांचे उल्लंघन करणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने, चंद्रकांत पाटील आणि कवी मोहन काळे उपस्थित होते. कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य व शिक्षकांनी सहकार्य केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीबाबत जागरूकता निर्माण होऊन सुरक्षिततेची जाणीव वाढण्यास मदत होईल असा विश्वास औदुंबर पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Yavatmal: पीककर्ज वाटपाची गती मंदावली; आतापर्यंत 21 टक्के वाटप; दोन हजार 200 कोटीचे उदिष्ट

Latest Marathi News Live Update : १ जून रोजी ज्या ठिकाणी मुख्यमंत्री विजय यांची रॅली आयोजित करण्यात आली आहे, त्या ठिकाणी तयारी सुरू

Amravati: शासकीय कामासाठी खासगी आयडीचा वापर; चौकशीचा अहवाल एटीसींकडे : गृहपालाच्या अडचणीत वाढ

SCROLL FOR NEXT