मुंबई

राम जन्मोत्सवासाठी सजले बेलापूर

CD

राम जन्मोत्सवासाठी बेलापूर सज्ज

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : रामनवमी उत्सवानिमित्त नवी मुंबईतील बेलापूर गाव सजले आहे. या गावात गुढीपाडव्यापासून दररोज कीर्तन, काकड आरती, हरिपाठ आदींनी परिसर दुमदुमला आहे. गुरुवारी (ता. २६) राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यासाठी बेलापूरवासीय आता सज्ज झाले आहेत.
ठाणे-बेलापूर पट्ट्यातील बेलापूर गाव हे राम-मारुती जन्मोत्सवाच्या यात्रेमुळे ओळखले जाते. श्रीराम जन्मोत्सवाची परंपरा या गावाने १६४ वर्षांपासून आजतागायत जपली आहे. २६ मार्चला बेलापूर येथील श्री राम-मारुती जन्मोत्सव मंडळाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्याकरिता संपूर्ण बेलापूर पंचक्रोशी जत्रा आणि यात्रेच्या निमित्ताने गजबजली आहे. या सोहळ्याची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच झाली असून दररोज बेलापूरकर राष्ट्रीय कीर्तनकार वज्रांग चारूदत्त आफळे यांच्या सुश्राव्य कीर्तनात न्हाऊन निघत आहेत. रामजन्म सोहळ्यानंतर छाया-कला सर्कल (दिवाळे कोळीवाडा) यांचे सुस्वर ब्रास बॅण्डवादनदेखील होणार आहे.

कुस्त्यांचे फड रंगणार
राम जन्मोत्सवाच्या दिवशी बेलापूरमध्ये जंगी कुस्त्यांचे फड भरविले जातात. यामध्ये सर्वश्रेष्ठ मल्लास संस्थेतर्फे ढाल आणि बेलापूर केसरी व ११ हजार १११ रुपये असा किताब बहाल करण्यात येणार आहे. तसेच इतर कुस्त्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसेही दिली जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नीलेश म्हात्रे यांनी दिली. नवी मुंबईसह ठाणे व मुंबई येथील भक्तगण बेलापूर येथील राम जन्मोत्सव उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. रामनवमीच्या उत्सवानिमित्ताने बेलापूर गावात हजारोंच्या संख्येने भक्तगण राम मंदिराला भेट देत असल्याचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

SCROLL FOR NEXT