वाशीत फेरीवाल्यांचा उच्छाद
पालिकेकडून कारवाईची मागणी
वाशी, ता. २५ (बातमीदार) ः नवी मुंबईत पालिकेकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचे सत्र सुरु आहे. मात्र, दुसरीकडे वाशी विभाग कार्यालया अंतर्गत परिसरात फेरीवाले वाढतच असल्याचे दिसत आहे. वाशी रेल्वे स्थानक आणि परिसर ते गावदेवी मंदिर या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाले वाढल्याने नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. या फेरीवाल्यांवर पालिकेने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वाशीतील गावदेवी मंदिर, त्रिमूर्ती हॉटेल ते शिवसेना शाखा रोड या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा संध्याकाळच्या वेळेत फेरीवाले ठाण मांडून बसत असल्याने नागरिकांना चालणे देखील कठीण होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर वाहतूक कोंडीदेखील होत आहे. विशेष म्हणजे वाशी रेल्वे स्थानकासमोर सिडकोने नियोजित केलेल्या हॉटेल व्यवसायिकांनी आपल्या दुकानालगत इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परस्पर जागा भाडयाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनेकदा कारवाई करण्यात येते. मात्र, अतिक्रमण पथकाची पाठ फिरताच पुन्हा या सर्वच ठिकाणी फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते बसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दिवसेंदिवस फेरीवाले वाढत असल्याने पालिकेने ठोस उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.