मुंबई

ठाण्यात राजस्थान दिवसाचा भव्य महोत्सव

CD

ठाण्यात ‘राजस्थान दिवसा’चा महोत्सव
सांस्कृतिक जल्लोषाला रंगणार उत्सव
ठाणे, ता. २६ (बातमीदार) : राजस्थानच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि एकतेचे प्रतीक असलेला राजस्थान दिवस यंदा ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. राजपूताना रियासतांचे एकत्रीकरण होऊन ३० मार्च रोजी ‘वृहत राजस्थान’ची स्थापना झाली होती आणि त्याच दिवसाला राजस्थान दिवस म्हणून ओळखले जाते.
ठाणे येथील वर्तक नगर प्रभाग समितीच्या वेदांत खुल्या रंगमंचावर सोमवारी (ता. ३०) सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत राजस्थान विकास मंच महाराष्ट्र यांच्या वतीने ‘राजस्थान महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राजस्थानातील सुप्रसिद्ध लोकगायक आणि लोकनृत्य कलाकार आपली रंगतदार सादरीकरणे करणार आहेत. विशेष आकर्षण म्हणून राजस्थानी महिलांकडून पारंपरिक वेशभूषेत ‘घूमर’ नृत्य सादर होणार आहे.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी राजस्थान महोत्सव आयोजन समितीचे मुख्य संरक्षक राकेश मोदी, अरुण जोशी, विजयकुमार बसावतिया, चंद्रकुमार जाजोदिया, महेश जोशी, महावीर शर्मा, प्रदीप गोयनका, सुरेंद्र समां, उदय परमार, अशोक पारेख, लक्ष्मीकांत मूंदडा, कपूररामावत, विमल हिरेन, विटीका जैन, इंद्रा वैष्णव आणि कार्यकारिणी सदस्य मेहनत घेत आहेत.

भामाशाहांचा ‘राजस्थान गौरव’
याप्रसंगी राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भामाशाहांचा ‘राजस्थान गौरव’ आणि ‘राजस्थान विभूषण’ पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

PBKS vs DC Live: स्टार्क, एनगिडी अपयशी ठरले, तिथे २२ वर्षीय माधवने मैदान गाजवले! प्रियांश, श्रेयसच्या फिफ्टीनंतरही माफक धावा...

Pune Jewellery Market: पंतप्रधानांच्या आवाहनाचा पुण्याच्या सराफा बाजारावर काय परिणाम झाला? व्यापारी काय म्हणताएत?

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

SCROLL FOR NEXT