स्मशानभूमीत मोफत ‘गॅस दहन वाहिनी’ सुरू करा
ठाकरे गटाच्या ज्योती पाटील यांची आयुक्तांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : दिवा शहरात नागरिकांना अंत्यसंस्कारावेळी येणाऱ्या आर्थिक अडचणी लक्षात घेता, दातिवली येथील स्मशानभूमीत तातडीने गॅस दहन वाहिनी कार्यान्वित करावी आणि ती मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या महिला शहर संघटिका ज्योती पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे. तसेच, लाकडाचा वापर कमी झाल्यामुळे वृक्षतोड थांबेल आणि हवेचे प्रदूषणही कमी होऊन पर्यावरणाचे रक्षण होईल. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांनी निवेदन दिले आहे.
दातिवली येथील स्मशानभूमी हे दिवा परिसरातील अंत्यसंस्काराचे मुख्य ठिकाण आहे. सध्या या ठिकाणी केवळ लाकडाचा वापर करूनच दहन केले जाते. मात्र, वाढत्या महागाईमुळे लाकडाच्या किमती गगनाला भिडल्या असून, गरीब कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण पडत आहे. दुःखाच्या प्रसंगी सर्वसामान्यांना हा खर्च पेलणे कठीण होत असल्याचे पाटील यांनी म्हंटले आहे. पालिकेने या ठिकाणी गॅस दहन वाहिनी सुरू केल्यास ही सेवा नागरिकांना पूर्णपणे मोफत देता येईल, यामुळे जनतेला मोठा आर्थिक दिलासा मिळेल.
या सुविधेमुळे केवळ आर्थिक बचतच होणार नाही, तर लाकडाचा वापर कमी झाल्यामुळे वृक्षतोड थांबेल आणि हवेचे प्रदूषणही कमी होऊन पर्यावरणाचे रक्षण होईल. तसेच गॅस दहन पद्धती ही पारंपारिक पद्धतीपेक्षा जलद आणि अधिक स्वच्छ असल्याने वेळेचीही मोठी बचत होईल, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून दातिवली स्मशानभूमीत गॅस दहन वाहिनी बसवण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशी विनंती ज्योती पाटील यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.